टोनी ब्लेअर

एक ब्रिटिश राजकारणी

ॲंथनी चार्ल्स लिंटन ब्लेअर (इंग्लिश: Anthony Charles Lynton Blair; ६ मे १९५३) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा माजी पंतप्रधान आहे. १९९७ ते २००७ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेला ब्लेअर त्याच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे चर्चेत राहिला. अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्यांनंतर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने चालू केलेल्या अफगाणिस्तानइराक युद्धांना ब्लेअरने बिनशर्त व संपूर्ण पाठिंबा दिला. अनेक टीकाकारांनी ब्लेअरला बुशचा चमचा ही उपाधी दिली होती.

टोनी ब्लेअर
Tony Blair 2010 (cropped).jpg

कार्यकाळ
२ मे १९९७ – २७ जून २००७
राणी एलिझाबेथ दुसरी
उपपंतप्रधान जॉन प्रेस्कॉट
मागील जॉन मेजर
पुढील गॉर्डन ब्राउन

जन्म ६ मे, १९५३ (1953-05-06) (वय: ७०)
एडिनबरा, स्कॉटलंड
राजकीय पक्ष मजूर पक्ष

१० वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर जून २००७ मध्ये मजूर पक्षाने पक्षनेतेपदी गॉर्डन ब्राउनची निवड केली व ब्लेअरने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच मध्य पूर्वेमधील इस्रायल-पॅलेस्टाइन वाद मिटवण्यासाठी निर्माण केलेल्या आंतरराष्ट्रीय समितीवर ब्लेअरची विशेष राजदूत ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली. मे २००८ मध्ये ब्लेअरने टोनी ब्लेअर फेथ फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना केली.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: