टाटा मोटर्स
टाटा मोटर्स ही भारतातील सर्वांत मोठी व्यावसायिक वाहने बनवणारी टाटा समूहाची कंपनी असून विविध प्रकारचे ट्रक हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. मागील १५ ते २० वर्षात टाटा मोटर्सने लहान व मध्यम गाड्यांमध्ये लक्षणीय झेप घेतली आहे. या कंपनीने जगातील सर्वांत स्वस्त गाडी बनवण्याचा ध्यास घेतला असून. टाटा नॅनो १ लाख रुपयात सर्व सामान्यांसाठी चारचाकी गाडी असे सादरीकरण केले आहे. यामुळे प्रथमच भारतीय वाहननिर्मितीची आंतराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद दखल घेतली गेली. तसेच प्रसिद्ध लँड रोव्हर व जॅग्वार ह्या ब्रिटिश वाहन कंपन्या या कंपनीने विकत घेतल्या. त्यामुळे टाटा मोटर्स या कंपनीचा व भारताचा आंतराष्ट्रीय वाहन निर्मितीत भारताचा दबदबा वाढला. या कंपनीचा पुणे येथे मोठा कारखाना आहे. किंबहुना पुणे शहराची औद्योगिक शहर म्हणून ओळख होण्यास या कंपनीचा मोठा वाटा आहे. तसेच जमशेदपूर येथेही कारखाना आहे. नॅनोसाठी पश्चिम बंगालमध्ये सिंगूर येथे टाटा मोटर्स या कंपनीने घेतलेल्या जागेवर २००७-०८ मध्ये बरेच आंदोलन झाले व टाटा मोटर्स कंपनी यामुळे माध्यमांमध्ये चर्चेत होती.
Indian multinational automotive manufacturing company | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | automobile manufacturer, व्यवसाय, सार्वजनिक कंपनी | ||
---|---|---|---|
उद्योग | automotive industry | ||
स्थान | भारत | ||
मुख्यालयाचे स्थान |
| ||
संस्थापक | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
उत्पादने
संपादन- टाटा सिएरा
- टाटा इस्टेट
- टाटा सुमो
- टाटा सुमो ग्रॅंडे
- टाटा सफारी
- टाटा इंडिका
- टाटा इंडिका व्हिस्टा
- टाटा इंडिगो
- टाटा इंडिगो मरीना
- टाटा इंडिगो मान्झा
- टाटा विंगर
- टाटा मॅजिक
- टाटा नॅनो
- टाटा झेनॉन
- टाटा आरिया
- टाटा व्हेन्चर
- टाटा मॅजिक आयरिस
कनसेप्ट वाहने
संपादन- २००० आरिया रोडस्टार
- २००१ आरिया कूप
- २००२ टाटा इंडिका
- २००४ टाटा इंडिगो एडवेन्ट
- २००५ टाटा होवर
- २००६ टाटा क्लिफराईडर
- २००७ टाटा एलेगेन्ट
- २००९ टाटा प्र१मा
- २०१० टाटा व्हर्सा
- २०१० टाटा इसोटा
- २०११ टाटा पिक्सल
- २०११ टाटा सनी
व्यावसायिक
संपादन- टाटा एस
- टाटा टीएल/टेलीकोलीन/२०७ डीआई पिकअप ट्रक
- टाटा ४०७ एक्स आणि एक्स२ :मालवाहतुकीसाठी तसेच प्रवासी वाहतुकीसाठी, शहरी आणि ग्रामीण भागात उपयुक्त असे छोटे व्यावसायिक वाहन.
- टाटा ७०९ एक्स
- टाटा ८०९ एक्स आणि एक्स २
- टाटा ९०९ एक्स आणि एक्स २
- टाटा ११०९ (मध्यम ट्रक)
- टाटा १५१०/१५१२ (मध्यम बस)
- टाटा १६१०/१६१६ (भारी बस)
- टाटा १६१३/१६१५ (मध्यम ट्रक)
- टाटा २५१५/२५१६ (मध्यम ट्रक)
- टाटा ३०१५ (भारी ट्रक)
- टाटा ३५१६ (भारी ट्रक)
- टाटा नोव्हस (या जड ट्रकचा आराखडा टाटा देवूने तयार केला)
सैनिकी वाहने
संपादन- टाटा ४०७ ट्रूप कॅरियर,
- टाटा एलपीटीए ७१३ टीसी (४x४)
- टाटा एलपीटी ७०९ ई
- टाटा एसडी १०१५ टीसी (४x४)
- टाटा एलपीटीए १६१५ टीसी (४x४)
- टाटा एलपीटीए १६२१ टीसी (६x६)
- टाटा एलपीटीए १६१५ टीसी (४x२)[१]