टाटा नॅनो

टाटा मोटर्सने उत्पादित केलेली कॉम्पॅक्ट सिटी कार

टाटा नॅनो (इंग्लिश भाषा: Tata Nano) ही टाटा मोटर्स कंपनीने बनवलेली नवीन चारचाकी (कार) आहे. टाटा नॅनो ही जगातील सर्वात स्वस्त प्रवासी कार आहे. ह्या कारची किंमत साधारण १ लाख रुपये ($ २०००) आहे. २३ मार्च २००९ रोजी टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा ह्यांनी मुंबईमध्ये ह्या कारला सादर केले. भारतातील तसेच जगभरातील बातमीदारांनी टाटा नॅनोचे २१ व्या शतकातील क्रांतिकारी कार असे स्वागत केले होते.

  • इंजिन - ६२४ सीसी, ३३ बीएचपी
  • मायलेज - जवळपास ३० किमी/लिटर
  • सुरक्षा- आंतराष्ट्रीय स्पेसिफिकेशनप्रमाणे
  • उत्सर्जन - यूरो ४च्या स्टॅंडर्डनुसार
  • गिअरबॉक्स - ४ स्पीड मॅन्युएल
  • टाकीची क्षमता - ३० लिटर
  • इतर- फ्रंट डिस्क ब्रेक्स व मागे ड्रम ब्रेक्स्
  • सर्वोच्च वेग - ९० किमी/तास

विक्री

संपादन

भारतीय स्टेट बँकेच्या शाखांमध्ये टाटा नॅनोच्या नोंदणीसाठीचे अर्ज उपलब्ध झाले होते. वेबसाईटवर टाटा नॅनोच्या किमतीसंबंधी तसेच या मोटारी विषयीची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. नोदणीअर्जाची किंमत तीनशे रुपये ठेवली होती. या अर्जासोबत गिऱ्हाइकांनी तीन हजार रुपये आगामी शुल्क भरले. ३ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत स्टेट बँकेत टाटा नॅनोची नोंदणी झाली. नोंदणी केलेल्या ग्राहकांना टाटा नॅनोची जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. एक लाख नॅनोची लॉटरी पद्धतीने प्रथम विक्री केली गेली. नोंदणी केलेल्या ग्राहकांना जोपर्यंत नॅनो मिळत नाही तोपर्यंत ग्राहकांनी भरलेल्या तीन हजार रुपयांच्या शुल्कावर टाटा मोटर्सने व्याजदेखील दिले.

नॅनोची चार माॅडेल्स आहेत. नॅनो (नॉर्मल) रुपये, दुसरे मॉडेल (नॉन मेटॅलिक), तिसरे मेटॅलिक आणि चौथे टॉप मॉडेल (एलएक्स -युरो ३)..

१७ जुलै २००९ रोजी नॅनोचे वितरण चालू झाले. लकी ड्रॉ पद्धतीने मुंबईचे अशोक विचारे 'नॅनो'चे पहिले मानकरी ठरले.

नॅनोची पुस्तकरूपी कहाणी

संपादन
  • स्मॉल वंडर- नॅनोची नवलकथा (इंग्रजी लेखक - ख्रिस्ताबेल नोरोन्ह, फिलीप चॅको, सुजाता अग्रवाल ) : टाटाच्या नॅनो गाडीची सफल कहाणी; मराठी अनुवाद : सुवर्णा बेडेकर.



हे सुद्धा पहा

संपादन