टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स
टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स (लघुरूप: टी.आय. ; इंग्लिश: Texas Instruments Inc., टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स इन्कॉ. ;) ही डॅलस, अमेरिका येथे मुख्यालय असलेली, अर्धवाहक व संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. इंटेल, सॅमसंग, तोशिबा या कंपन्यांपाठोपाठ अर्धवाहक उत्पादन क्षेत्रात टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स जगात चौथ्या क्रमांकाची कंपनी असून मोबाइल हॅंडसेटांसाठीच्या अर्धवाहक चिप उत्पादनात ती क्वालकॉम कंपनीखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आणि डिजिटल सिग्नल प्रोसेसर व ॲनालॉग अर्धवाहक उत्पादनात जगभरात अव्वल क्रमांकावर आहे [१].
![]() | |
ब्रीदवाक्य | टेक्नॉलॉजी फॉर इनोवेटर्स |
---|---|
प्रकार | सार्वजनिक |
उद्योग क्षेत्र | अर्धवाहक, इलेक्ट्रॉनिकी |
स्थापना |
इ.स. १९३० (’जिओफिजिकल सर्व्हिस इन्कॉर्पोरेटेड’ नावाने) इ.स. १९४७ (’टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स’ नावाने) |
मुख्यालय |
|
उत्पादने | इंटिग्रेटेड सर्किट, डिजिटल सिग्नल प्रोसेसर |
महसूली उत्पन्न | १४.२६ अब्ज अमेरिकन डॉलर (इ.स. २००६) |
कर्मचारी | ३०,९८६ (इ.स. २००७) |
संकेतस्थळ | www.ti.com |
या कंपनीचे मुख्यालय डॅलसमध्ये असून रिचर्डसन येथे मोठे प्रांगण आहे.
संदर्भ संपादन करा
- ^ "डेटाबीन्स - इ.स. २००९ अॅनालॉग अर्धवाहक उत्पादन क्षेत्रातील बाजारहिस्से" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-01-16. 2011-01-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे संपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)