त्र्यंबक मुकुंदराव कांबळे (१९४६/१९५६ – २८ सप्टेंबर २०१३), टी.एम. कांबळे म्हणून लोकप्रिय, हे एक भारतीय राजकारणी व सामाजिक कार्यकर्ता होते. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे नेते होते, हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे. इ.स. १९९०-९६ दरम्यान, ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. ते एक लोकप्रिय दलित नेते होते.[][]

टी.एम. कांबळे

कार्यकाळ
१९९० – १९९६

जन्म १९४६/१९५६
लातूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू २८ सप्टेंबर २०१३
लातूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले), भारतीय रिपब्लिकन पक्ष (लोकशाहीवादी)
वडील मुकुंदराव कांबळे
व्यवसाय समाजकारण व राजकारण
धर्म बौद्ध

कांबळे हे भारतीय दलित पॅंथरच्या स्थापनेपासून राजकारणात होते. ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यातील समन्वयवादी नेते, तसेच दलित पॅंथर चळवळीतील सक्रिय नेते होते. ते एक आंबेडकरवादी कार्यकर्ता व बौद्ध धर्मीय होते. कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे माजी अध्यक्ष होते. ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी हा पक्ष सोडला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) या नव्या पक्षाची स्थापना केली, आणि त्याचे अध्यक्ष झाले.[][][][][]

२८ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचे विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्र, लातूर येथे वयाच्या ५६/६७ व्या वर्षी निधन झाले.[][]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Minister should disclose those against raising Khairlanji". IBN Live. PTI. 5 August 2010. 2012-10-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 December 2010 रोजी पाहिले.
  2. ^ Kuber, Girish (1 December 2006). "Dalit fury: Blame it on failed leaders". Economic Times. TNN. 8 December 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "आरपीआई नेता टीएम कांबले का निधन". Dainik Bhaskar. 29 सप्टें, 2013. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "माजी आमदार टी. एम. कांबळे यांचे निधन". 29 सप्टें, 2013. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "टी. एम. कांबळे |". 2023-04-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-03 रोजी पाहिले.
  6. ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-tm-kambale-is-no-more-rip-4388476-NOR.html
  7. ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-ex-mla-t-4388074-NOR.html
  8. ^ "RPI leader T M Kamble dies". The Indian Express. 1 December 2006. 1 October 2013 रोजी पाहिले.
  9. ^ https://www.loksatta.com/vruthanta-news/former-mla-t-m-kamble-died-209387/