टँपा आंतरराष्ट्रीय विमानतळ

टॅंपा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: RSWआप्रविको: KRSWएफ.ए.ए. स्थळसूचक: RSW) अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील टॅंपा शहराचा विमानतळ आहे.

या विमानतळावर सिल्व्हर एरवेझचे मुख्य ठाणे आणि साउथवेस्ट एरलाइन्सचा मोठा तळ आहे. येथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना तसेच कॅरिबियन, मध्य अमेरिका आणि युरोपमधील शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून साउथवेस्ट एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. टॅंपा विमानतळावरून फेडेक्स एक्सप्रेस आणि प्राइम एर मालवाहतूक करतात. याला आधी ड्रू फील्ड म्युनिसिपल विमानतळ असे नाव होते.