झकॅरी टेलर
झकॅरी टेलर (इंग्लिश: Zachary Taylor ;) (२४ नोव्हेंबर, इ.स. १७८४ – ९ जुलै, इ.स. १८५०)हा अमेरिकेचा बारावा राष्ट्राध्यक्ष व अमेरिकी सेनाधिकारी होता. सुरुवातीस राजकारणात रस नसलेला टेलर इ.स. १८४८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकींत व्हिग पक्षाच्या तिकिटावर उभा राहिला व लुईस कास याला हरवत अध्यक्षपदी निवडला गेला. ४ मार्च, इ.स. १८४९ ते ९ जुलै, इ.स. १८५० या कालखंडात त्याने अध्यक्षपद सांभाळले.
झकॅरी टेलर | |
सही |
---|
अमेरिकी सैन्यातल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत टेलर इ.स. १८१२ चेयुद्ध, ब्लॅक हॉक युद्ध व दुसरे सेमिनोल युद्ध, या युद्धांत लढला होता. मेक्सिकन-अमेरिकन युद्धात पालो आल्टो व मॉंटेरीच्या लढायांमध्ये नेतृत्व करत त्याने अमेरिकी सैन्याच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. टेलराने ाअपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत न्यू मेक्सिको व कॅलिफोर्निया येथील रहिवाश्यांना प्रादेशिक अधिमान्यता मिळवण्याऐवजी आपापल्या राज्यघटना बनवून संस्थान म्हणून अधिमान्यता मिळवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले व दक्षिणेकडील गुलामी-समर्थक राज्यांचा रोष पत्करला. या घडामोडीतूनच पुढे इ.स. १८५०ची तडजोड घडून आली.
बाह्य दुवे
संपादन- "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- "झकॅरी टेलर: अ रिसोर्स गाइड (झकॅरी टेलर: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |