झुलू

(झुलु या पानावरून पुनर्निर्देशित)

झुलू हा आफ्रिकेच्या दक्षिण भागातील एक मोठा वांशिक गट आहे. झुलू व्यक्ती प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नाताल ह्या प्रांतामध्ये वसल्या असून सध्या झुलूंची लोकसंख्या सुमारे १ कोटी आहे. ते झुलू भाषा बोलतात. काही झुलू लोक झिंबाब्वे, झांबिया आणि मोझांबिक या देशांतही राहतात.

स्थानिक झुलू व्यक्ती

जानेवारी १९४९ मध्ये झुलू लोकांनी डर्बन शहरात घडवून आणलेल्या दंगलीत १४२ भारतीय मारले गेले होते. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णद्वेषी राजवटीदरम्यान झुलू लोकांसाठी क्वाझुलू नावाचा विशेष भूभाग निर्माण केला गेला होता व सर्व झुलूंना तेथे स्थानांतर करणे सक्तीचे होते.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन