सार्वजनिक उपद्रव

(झुंडशाही या पानावरून पुनर्निर्देशित)

सार्वजनिक उपद्रव आणि झुंडशाही म्हणजे सार्वजनिकपणे जनक्षोभ किंवा जनआंदोलनाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन शिक्षेचा अधिकार स्वतःच्या हातात घेणे, एखादी गोष्ट करण्यापासून वाटेल त्यास बेकायदा प्रतिबंधीत करणे अथवा करवून घेण्या साठी उपद्रव मुल्य वापरून अथवा तसे करण्याची धमकी देऊन केलेली दडपशाही अथवा दंडेलशाही होय.

जेव्हा घटनात्मक जबाबदारी असलेल्या संस्था स्वतःची जबाबदारी पार पाडण्यात ,लोकशाहीचे आधारस्तंभ सुयोग्य न्याय वेळेत देण्यात अपयशी होतात सोबत समाज किंवा माध्यमांच्या सर्वसाधारण काळातील असंवेदनशील दुर्लक्ष आणि जबाबदार नेतृत्वाच्या अभावामुळे किंवा विरोधकांच्यातील नेतृत्वगुण आणि संवादकौशल्याच्या अभावामुळे सार्वजनिक उपद्रवास पर्याय नसल्याचे चित्र निर्माण होऊन उपद्रव मनोवृत्तीबाद्दल सामूहिक सहानुभूती निर्माण होऊन अनेकदा सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था कोलमडण्याच्या घटना घडतात.[ संदर्भ हवा ]

सार्वजनिक उपद्रव आणि सार्वभौमत्वाचे हनन

संपादन

शिक्षेचा अधिकार स्वतःच्या हातात घेणे, हा देशाच्या सार्वभौमत्वावरील आघात असतो.भारत हे एक लोकशाही-प्रजासत्ताक आहे. राष्ट्राशी निष्ठा राखणे म्हणजेच राज्यघटनेनुसार चालणाऱ्या एकमेव शासनसंस्थेला सार्वभौम मानणे होय. सार्वभौमता म्हणजे कोणत्याही कथित गुन्हेगाराला शिक्षा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त शासनसंस्थेलाच राहणे. अगदी "रेडहॅण्ड' सापडलेल्या पाकीटमाराला जमावाने मारहाण करणे, हेदेखील शासनाच्या सार्वभौमतेचा भंग करणेच ठरते. पाकीटमाराचे उदाहरण अशासाठी, की त्याची दण्डार्हता सिद्धच मानलेली असते. झुंडशाही ज्या कोणाच्या विरोधात किंवा निषेधार्थ चालविली जाते, त्याची तीच लायकी होती किंवा कसे, या प्रश्‍नात न अडकता आपल्याला झुंडशाही या कृतिप्रकाराबाबत स्पष्टपणे भूमिका घेता आली पाहिजे.

विविध रंगांच्या राजकारण्यांनी "जनआंदोलन' या नावाखाली उघड उघड झुंडशाही जोपासणे व निरनिराळ्या झेंड्यांच्या "झुंडहृदय'- सम्राटांच्या रूपात घटनाबाह्य सत्ताकेंद्रे उभी करण्याचा सपाटा लावलेला आहे. हे लोकशाहीसाठी- किंबहुना सभ्य समाजधारणेसाठी अत्यंत धोक्‍याचे आहे. परंतु, अशा घटनांच्या वेळी "लक्ष्य' बनवलेल्या व्यक्ती किंवा कलाकृतीचे मूल्यमापन करण्याचा मोह पडत राहतो.[]

कलात्मक अभिव्यक्तीला उपद्रव

संपादन

नाटक अथवा चित्रपट ही एक कलाकृती आहे. कला ही स्वायत्त असावी. तिच्यावर कोणतेही बंधन लादू नये. कलावंताला आपले म्हणणे अथवा मत मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. या साऱ्या प्रकारात कलावंताचे अविष्कार स्वातंत्र्य व आपल्या बौद्धिक कुवतीनुसार त्या कलाकृतीचे मूल्यमापन करण्याचा प्रेक्षकाचा अधिकार असावा अशी कला निर्मात्याची अपेक्षा असते[]

नैतिक सुभेदारांच्या उपद्रव मुल्यास घाबरून बऱ्याच कलावंत आणि निर्मात्यांनी शरणागती पत्करल्याचे किंवा छळसहन केलयाचे आढळून येते.[] असे असले तरी अभिव्यक्त होण्या साठी छळ सहसा व्यक्तींना व्यक्तीगत पातळीवर सहन करावा लागतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू सामूहिक पणे उचलून धरणे सहसा टाळले जाते त्यामुळे नैतिक सुभेदारांच्या उपद्रव मुल्याचे महत्त्व वाढते.

विचारांना विचारांनी किंवा शांततामय विरोधकरण्यापेक्षा उपद्रव मुल्य जाणवूबन देणारे लोक स्वतःच्या हिंसेचे समर्थन विशीष्ट असल्याचे आणि प्रत्येक वेळी स्वतःस सोयीची कारणमिमांसा देताना आढळून येतात.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ दै.सकाळ २० फेब्रुवारी ला प्रसिद्ध झालेला हा मूळ लेख राजीव साने
  2. ^ "ऑनलाईन मटा आवृत्तीपान १२ फेब्रू २०१० सायं ५ वाजता जसे दिसले". 2010-01-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-12 रोजी पाहिले.
  3. ^ "आनंद यादव मटा आवृत्ती पान १२ फेब्रू २०१० सायं ५ वाजता जसे दिसले". 2009-07-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-12 रोजी पाहिले.