जोसेफ कोनी हा लॉर्ड रेसिस्टंस आर्मीचा संस्थापक आहे. आंतर्राष्ट्रीय गुन्हेगारीमध्ये जोसेफ कोनीच क्रमांक १ आहे. जोसेफ कोनी स्वतःला देवाचा दूत मानतो व लहान मुलांचे अपहरण करून त्यांच्या हाती बंदूक देऊन त्यांना अतिरेकी बनवतो. २०१२ मध्ये कोनी २०१२ माहितीपटाने त्याला जगासमोर आणले, व इतिहासात प्रथमच लोकांच्या दबावामुळे अमेरिकेने चांगल्या कामासाठी आपले सैनिक उगांडाला (दुसऱ्या देशी-दुसऱ्या सैन्याची मदत करायला) पाठवले आहेत.

जोसेफ कोनी
जन्म जोसेफ
१९६१
ओडेक , उगांडा
राष्ट्रीयत्व उगांडा
उंची ५ फूट ११ इंच
ख्याती कुप्रसिद्ध दहशतवादी

१९६१ साली शेतकरी कुटुंबात कोनीचा जन्म झाला.तरुणपणी तो जादू-टोणा वैद्याचा (वित्च डॉक्टर) साहाय्यक म्हणून भावाबरोबर काम कारचा, भावाचा मृत्यू झाल्यावर त्याने ती जागा बळकावली.

१९८६ मध्ये कोनीने धार्मिक संघटनेचे नेतृत्व स्वीकारले. तो स्वतःला प्रभूचा अवतार सांगत असे. उगांडा मधील बंडखोर "नॅशनल रेसिस्टंस आर्मी"ची ताकद जशी जशी कमी होत गेली, तशी तशी कोनीची प्रसिद्धी वाढत गेली. कोनी ने मुलांचे अपहरण करणे सुरू केले , व त्यांना तो सैनिकी प्रशिक्षण देऊन अहिंसा करण्यास प्रवृत्त करतो. तो जनमानसात शांततेच्या नावाखाली अहिंसा पसरवतो. त्याने आधी बऱ्याच वेळेला शांती प्रास्तापित करण्या साठी भाषणे केली आहेत.

अटक मोहीम

संपादन

इनविसिबल चिल्ड्रेन संस्था २०१२ मध्ये कोनीला अटक करण्यासाठी आंतर्राष्ट्रीय "कोनी २०१२" ही मोहीम राबवत आहे. त्या अंतर्गत अमेरिकेवर लोक दबाव गट तयार करण्यासाठी एका लघुपटाचे निर्माण करण्यात आले आहे. लघुपट कमी काळात वणव्या सारखा पसरला, व काही दिवसातच बिल गेट्स इत्यादी प्रभावी लोकांनी पण सरकार वर दबाव आणण्यास सुरुवात केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उगांडा मध्ये आपले सैन्याची एक तुकडी अगोदरच पाठवली आहे.