जनरल जॉर्ज स्मिथ पॅटन कनिष्ठ (११ नोव्हेंबर, इ.स. १८८५:सान गॅब्रियेल, कॅलिफोर्निया, अमेरिका - २१ डिसेंबर, इ.स. १९४५:हायडेलबर्ग, जर्मनी) हा अमेरिकेचा सैन्याधिकारी होता. याने दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या सैन्याचे सिसिली, फ्रांस, जर्मनी आणि युरोपमधील इतर रणांगणांवर नेतृत्व केले.

पॅटनने १९४२मध्ये ऑपरेशन टॉर्च या मोहीमेदरम्यान कॅसाब्लांका शहरावर चढाई केली. त्यावेळी हतबल झालेल्या अमेरिकन सैनिकांना त्याने आपल्या भाषणातून आणि कर्तृत्त्वातून कित्ता दिला व चढाई सफल केली. त्यानंतर अमेरिकेचे सातवे सैन्याचे नेतृत्व करी त्याने सिसिली काबीज केले. जून १९४४मध्ये त्याने आपले सैन्य घेउन फ्रांस पार केले आणि बॅटल ऑफ द बल्ज या घनघोर लढाईत अडकून पडलेल्या अमेरिकन सैन्याची सुटका केली.

युद्ध संपल्यानंतर वाहनअपघातात जखमी झाल्याने पॅटन हायडेलबर्ग येथे मृत्यू पावला.

अमेरिकेच्या सैन्याने १९५० ते १९९० दरम्यान तयार केलेल्या चार प्रकारच्या रणगाड्यांना पॅटनचे नाव दिले होते.

याचा मुलगा जॉर्ज एस. पॅटन हा सुद्धा अमेरिकन सैन्यात अधिकारी होता.