सर जॉन जॉर्ज वुड्रॉफ (१५ डिसेंबर १८६५ - १६ जानेवारी १९३६) हे ब्रिटिश भारतविद होते. आर्थर ॲव्हलॉन या टोपणनावाने त्यांनी तंत्रशास्त्र व अन्य हिंदू परंपरांवर विस्तृत लेखन केलेले आहे. त्यांच्या लेखनामुळे पाश्चात्य जगात हिंदू तत्त्वज्ञानयोग यांबद्दल नवी उत्सुकता निर्माण झाली.

सर जॉन वुड्रॉफ
जन्म १५ डिसेंबर १८६५
कलकत्ता, भारत
मृत्यू १६ जानेवारी १९३६ (वय ७०)
फ्रान्स
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
टोपणनावे अार्थर ॲव्हलॉन
नागरिकत्व इंग्लंड
पेशा वकील
प्रसिद्ध कामे द सर्पन्ट पावर
वडील जेम्स टिस्डाल वुड्रॉफ
आई फ्लॉरेन्स वुड्रॉफ

द सर्पन्ट पावर

संपादन

वुड्रॉफ यांचे हे पुस्तक म्हणजे पूर्णानंद (इस सु. १५५०) यांच्या षट्चक्र-निरुपण (सहा दैहिक केंद्रांचे / चक्रांचे वर्णन) व पादुका-पंचक या लेखनकृतींचा अनुवाद व त्यावरील उत्कृष्ट टीका आहे. “सर्पन्ट पावर” (सर्पशक्ती) या संज्ञेने कुंडलिनीचा निर्देश केला गेला अाहे. ध्यान अाणि योगाभ्यासामुळे व्यक्तीमध्ये जी ऊर्जा जागृत होते तिला कुंडलिनी मानले जाते.

पुस्तके

संपादन
  • इंट्रडक्शन टू द तंत्र शास्त्रा
  • तंत्रा अॉफ द ग्रेट लिबरेशन (महानिर्वाण तंत्रा)
  • हिम्न्स टू द गॉडेस
  • शक्ती अँड शाक्ता
  • द सर्पन्ट पावर
  • द वर्ल््ड ॲज पावर
  • द गार्‌लॅंड अॉफ लेटर्स