जॉन एलिस बुश (११ फेब्रुवारी, इ.स. १९५३ - ) उर्फ जेब बुश हे एक अमेरिकन राजकारणी व फ्लोरिडा राज्याचे माजी राज्यपाल (गव्हर्नर) आहेत. ते फ्लोरिडाच्या गव्हर्नरपदावर १९९९ ते २००७ दरम्यान होते. जेब बुश अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश ह्यांचा मुलगा तर अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश ह्यांचे धाकटे भाऊ आहेत.

जेब बुश
Jeb Bush

फ्लोरिडा राज्याचा ४३वा राज्यपाल
कार्यकाळ
५ जानेवारी १९९९ – २ जानेवारी २००७
मागील बडी मॅकके
पुढील चार्ली क्रिस्ट

जन्म ११ फेब्रुवारी, १९५३ (1953-02-11) (वय: ७१)
मिडलंड, टेक्सास, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
आई बार्बरा बुश
वडील जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश
पत्नी कोलंबा बुश
व्यवसाय बँकर, सल्लागार
धर्म एपिस्कोपेलियन (१९९५ पर्यंत)
रोमन कॅथलिक (१९९५ नंतर)
सही जेब बुशयांची सही

रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणाऱ्या बुशने २०१६ सालच्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत