बार्बरा बुश (८ जून, १९२५:फ्लशिंग, क्वीन्स, न्यू यॉर्क, अमेरिका - १७ एप्रिल, २०१८, ह्युस्टन, टेक्सास, अमेरिका) ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशची पत्नी आणि जॉर्ज डब्ल्यू. बुशची आई होती. तिच्या सहा अपत्यांपैकी जेब बुश हा फ्लोरिडाचा भूतपूर्व गव्हर्नर आहे.

Barbara Bush portrait.jpg

राष्ट्राध्यक्षांची पत्नी या नात्याने बुश अमेरिकेची प्रथम महिला आणि उपराष्ट्राध्यक्षांची पत्नी नात्याने अमेरिकेची द्वितीय महिला होती.

अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षाची पत्नी व दुसऱ्याची आई असणाऱ्या दोन महिलांपैकी ॲबिगेल ॲडम्ससह बुश एक आहे.