जेंडर ट्रबल (पुस्तक)
जेंडर ट्रबल: फेमिनिझम अंड द सबवर्शन ऑफ आयडेंटीटी[१] हे प्रभावी स्त्रीवादी सिद्धांकन करणाऱ्या लेखिका जुडीथ बटलरचे[२] पुस्तक आहे. सदरचे पुस्तक १९९०, १९९९ व नंतर २००६ मध्ये रुत्लेज प्रकाशनाद्वारे प्रकाशित केलेले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
संपादन'स्त्रीवादी राजकारणाला खरेच स्त्री या कोटीक्रमाची व त्या संबंधित विषयांची गरज आहे का?' असा महत्त्वपूर्ण प्रश्न हे पुस्तक विचारते. या पुस्तकातील चार प्रकरणांच्या माध्यमातून लेखिका दाखवून देतात कि लिंगभाव हे निर्मित आहे व ते सादर केले जाते. या पुस्तकात 'ड्रॅग'[३] (एक असा व्यक्ती सामान्यतः पुरुष जो स्त्रियांचे वेश धारण करतो व बायकी व्यवहाराची अतिशयोक्ती सादर करतो) या पात्रा बाबतची चर्चा लिंगभाव या संकल्पनेला मोडकळीस आणण्यासाठी नव्हे तर लिंगभाव या कोटीक्रमाच्या वास्तवतेला अधिक गुंतागुंतीचे कारणासाठी केलेली आहे.
योगदान
संपादनस्त्रीवादी व क्वियर अभ्यासात हे पुस्तक महत्त्वाचे मानले गेलेले आहे.[४][५]
संदर्भ सूची
संपादन- ^ Butler, Judith (2011-09-22). Gender Trouble: Feminism and the Subversion of Identity (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781136783234.
- ^ "www.theory.org.uk Resources: Judith Butler". www.theory.org.uk. 2018-03-24 रोजी पाहिले.
- ^ "Urban Dictionary: drag queen". Urban Dictionary (इंग्रजी भाषेत). 2018-03-24 रोजी पाहिले.
- ^ "A Queer Overview of Judith Butler's [Gender Trouble]". Angel Daniel Matos, Ph.D. (इंग्रजी भाषेत). 2013-09-18. 2016-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-24 रोजी पाहिले.
- ^ Harding, Sandra (1991). Whose Science? Whose Knowledge?: Thinking from Women's Lives (इंग्रजी भाषेत). Cornell University Press. ISBN 0801497469.