जामिया मिलिया इस्लामिया
जामिया मिलिया इस्लामिया (अर्थ: राष्ट्रीय इस्लामिक विद्यापीठ) हे भारतातील नवी दिल्ली येथे स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. मूलतः १९२० मध्ये ब्रिटिश राजवटीत हे अलिगढ येथे स्थापित केले गेले. ते १९३५ मध्ये ओखला येथे त्याच्या सध्याच्या स्थानावर गेले. १९६२ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने याला डीम्ड दर्जा दिला व २६ डिसेंबर १९८८ रोजी ते केंद्रीय विद्यापीठ बनले.
public central university in Delhi | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | सरकारी विद्यापीठ, विद्यापीठ | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | केंद्रीय विद्यापीठ (भारत) | ||
स्थान | नवी दिल्ली, नवी दिल्ली जिल्हा, Delhi division, National Capital Territory of Delhi, भारत | ||
Street address |
| ||
संस्थापक |
| ||
स्थापना |
| ||
प्रायोजक |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
विद्यापीठाच्या फाउंडेशन कमिटीमध्ये अब्दुल बारी फिरंगी महाली, हुसेन अहमद मदनी, मुहम्मद इक्बाल, सनाउल्ला अमृतसरी, सय्यद मेहमूद आणि इतरांचा समावेश होता.दारुल उलूम देवबंदचे पहिले विद्यार्थी महमूद हसन देवबंदी यांनी त्याची पायाभरणी केली होती. मुहम्मद अली जौहर यांनी १९२० ते १९२३ पर्यंत पहिले उप-कुलगुरू म्हणून काम केले आणि हकीम अजमल खान यांनी १९२० ते १९२७ पर्यंत पहिले कुलगुरू म्हणून काम केले. मे २०१७ मध्ये नजमा हेपतुल्ला या विद्यापीठाच्या ११व्या कुलपती झाल्या.[१] [२]
२०२० मध्ये, भारताच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या क्रमवारीत जामिया मिलिया इस्लामिया देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकावर होते.[३] डिसेंबर २०२१ मध्ये, विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडिटेशन कौन्सिलद्वारे 'A++' रँकिंग प्राप्त झाले. [४]
जामिया मिलिया इस्लामियामध्ये दहा विद्याशाखा आहेत ज्या अंतर्गत ते शैक्षणिक कार्यक्रम देते.
- कायदा विद्याशाखा
- अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखा
- आर्किटेक्चर आणि एकिस्टिक्स विद्याशाखा
- मानवता आणि भाषा विद्याशाखा
- ललित कला विद्याशाखा
- सामाजिक विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय व्यवस्थापन विद्याशाखा
- नैसर्गिक विज्ञान विद्याशाखा
- शिक्षण विद्याशाखा
- दंतचिकित्सा विद्याशाखा
- व्यवस्थापन अभ्यास विद्याशाखा
उल्लेखनीय माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक
संपादनत्याच्या स्थापनेपासून, जामिया मिलिया इस्लामियाने उल्लेखनीय माजी विद्यार्थी तयार केले आहेत. बॉलीवूडमधील प्रसिद्ध माजी विद्यार्थ्यांमध्ये शाहरुख खान, मौनी रॉय यांचा समावेश आहे; पत्रकारितेत अरफा खानम शेरवानी, बरखा दत्त, अंजना ओम कश्यप ; राजकारणात अंपारीन लिंगडोह, कुंवर दानिश अली ; क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागचा समावेश आहे. याने मौलाना इम्रान रझा अन्सारी आणि मोहम्मद नजीब कासमी यांच्यासह उल्लेखनीय विद्वानांची निर्मिती केली आहे.
संदर्भ
संपादन- ^ "Najma Heptulla appointed new Jamia Chancellor". द टाइम्स ऑफ इंडिया. 2017-05-29. ISSN 0971-8257. 2023-03-13 रोजी पाहिले.
- ^ "Dr Syedna Mufaddal Saifuddin to be the new chancellor of Jamia Millia Islamia". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2023-03-13. 2023-03-13 रोजी पाहिले.
- ^ Ibrar, Mohammad (13 August 2020). "Jamia Millia Islamia tops central universities in government rankings". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-10-09 रोजी पाहिले.
- ^ "What got Jamia Millia Islamia NAAC A++ grade?". India Today (इंग्रजी भाषेत). 16 December 2021. 2022-10-09 रोजी पाहिले.