जामनगर

गुजरातमधील शहर


जामनगर (गुजराती: જામનગર) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. जामनगर शहर गुजरातच्या सौराष्ट्र भागात कच्छच्या आखाताच्या किनाऱ्याच्या जवळच वसले असून ते राजधानी गांधीनगरपासून ३२० किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली ४.८ लाख लोकसंख्या असणारे जामनगर अहमदाबाद, सुरत, वडोदराराजकोट खालोखाल गुजरातमधील पाचव्या क्रमांकाचे तर भारतामधील २६व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. जामनगर गुजरातमधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक मानले जाते. येथील रिलायन्स ह्या भारतामधील आघाडीच्या कंपनीचा खनिज तेल शुद्धीकरण कारखाना (रिफायनरी) जगातील सर्वात मोठा कारखाना मानला जातो.

जामनगर
જામનગર
भारतामधील शहर
जामनगर is located in गुजरात
जामनगर
जामनगर
जामनगरचे गुजरातमधील स्थान

गुणक: 22°28′12″N 70°4′12″E / 22.47000°N 70.07000°E / 22.47000; 70.07000

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
जिल्हा जामनगर जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १५४०
क्षेत्रफळ १२२ चौ. किमी (४७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५६ फूट (१७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,७९,९२०
  - महानगर ६,००,९४३
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
अधिकृत संकेतस्थळ

इ.स. १५४० साली स्थापन झालेले जामनगर सौराष्ट्राच्या नवानगर ह्या संस्थानाचा भाग होते. नवानगरचे युवराज व प्रसिद्ध क्रिकेटपटू रणजितसिंहजी ह्यांनी जामनगरचा खऱ्या अर्थाने विकास घडवला.

जामनगर विमानतळ सध्या भारतीय वायुसेनेच्या ताब्यात असून येथे एअर इंडियातर्फे मुंबईहून प्रवासी विमानसेवा चालवली जाते. जामनगर रेल्वे स्थानकामधून सौराष्ट्र एक्सप्रेस, सौराष्ट्र मेल इत्यादी अनेक गाड्या सुटतात.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत