जागतिक समन्वित वेळ

(जागतिक प्रमाणवेळ या पानावरून पुनर्निर्देशित)

जागतिक समन्वित वेळ (इंग्लिश: Coordinated Universal Time) किंवा यूटीसी हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळ मोजण्याचे एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाद्वारे सध्या जगातील सर्व स्थानांवरील प्रमाणवेळ ठरवली जाते. पूर्वी याच कामासाठी ग्रीनविच सरासरी वेळ (GMT) वापरली जाई.. ग्रीनविच सरासरी वेळ ही लंडनमधील ग्रीनिच ह्या स्थळाची स्थानिक वेळ आहे. ही यूटीसीशी मिळतीजुळती आहे. जगातील सर्व आंतरराष्ट्रीय कालविभाग आता यूटीसीच्या संदर्भात मोजले जातात.

जीएम् टीऐवजी यूटीसी का आले?

संपादन

लंडनमधील बिग बेन हे घड्याळ अत्यंत अचूक चालते. जवळच असलेल्या ग्रीनविच या वेधशाळेत सूर्य, तारे आदींच्या निरीक्षणातून पृथ्वीवरील घड्याळ्याची अचूक वेळ काढली जाई, आणि तिच्याप्रमाणे वेधशाळेतील क्रोनॉमीटर्स आणि अन्य घड्याळे जुळवून ठेवली जात. बिग बेन घड्याळ तीच वेळ दाखवते आहे की नाही याची दिवसातून अनेकदा तपासणी होत असे. ही सर्व घड्याळे यांत्रिक मशिनरीवर चालत. मशिनरीत काही बिघाड झाला तर पुढेमागे अचूक वेळ ठरविण्यास अडथळा होऊ शकला असता. त्यामुळे अचूक वेळ ठरविण्यास यंत्रांशिवाय दुसरे काही वापरणे गरजेचे होते.

पुढे असे लक्षात आले की, ’क्वार्ट्‌झ’ नावाच्या स्फटिकातली स्पंदने अत्यंत नियमित असतात. हा दगड नैसर्गिकरीत्या उत्पन्न झाला असल्याने लाखो वर्षांत त्याच्या स्पंदन वारंवरितेत सूक्ष्मातिसूक्ष्म बदलही होण्याची शक्यता नाही. या ’क्वार्ट्‌झ’च्या गुणाचा उपयोग करून हवी तितकी अचूक घड्याळे बनवली गेली. अशा अचूक घड्याळ्याने दाखविलेल्या अचूक वेळेला परमाण्विक वेळ म्हणतात. जी.एम्‌टीशी ही वेळ जुळवली की ती जागतिक वेळ होते. आणि पृथ्वीच्या भ्रमणकाळाबरोबर तिचा समन्वय साधला की ती जागतिक समन्वित वेळ होते. जागतिक वेळेत दर सहा महिन्यांनी एखाद्या सेकंदाची दुरुस्ती करून ती पृथ्वीच्या भ्रमणकाळाशी समन्वित केली जाते.

उदा. भारतीय प्रमाण वेळ यूटीसीच्या संदर्भात +५:३० आहे. याचा अर्थ जेव्हा भारतात दुपारचे ५:३० वाजतात, तेव्हा ग्रीनिचला दुपारचे बारा वाजलेले असतात.


बाह्य दुवे

संपादन