जागतिक कर्करोग दिन हा ४ फेब्रुवारी रोजी कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ओळखला जाणारा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. जागतिक कर्करोग दिन २००८ मध्ये लिहिलेल्या जागतिक कर्करोग घोषणेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) च्या मार्गदर्शनाने साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट कर्करोगामुळे होणारे आजार आणि मृत्यू लक्षणीयरीत्या कमी करणे हे आहे.[१] तसेच कर्करोगापासून बचाव करता येण्याजोग्या पीडितांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणण्याची ही एक संकल्पना आहे असे मानले जाते.[२] हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे पाळला जातो.[३]

जागतिक कर्करोग दिन चुकीच्या माहिती विरोधात जनजागृती करतो,[४] जागरूकता वाढवतो आणि हानी कमी करतो.[५] जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाने बाधित झालेल्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यापैकीची एक चळवळ म्हणजे #NoHairSelfie असून, यात लोकांनी स्वतःचे डोके मुंडन करून किंवा तशी आभासी प्रतिमा निर्माण करून ती सोशल मीडियावर प्रगट करण्याची जागतिक चळवळ आहे. याद्वारे कर्करोगावर उपचार घेत असलेल्यांसाठी एक प्रकारे मानसिक पाठिंबा दर्शविण्याची ही एक कृती आहे. अशा प्रकारचे जगभरात शेकडो कार्यक्रम घेतले जातात.[६][७]

जागतिक कर्करोग दिनाची स्थापना ४ फेब्रुवारी २००० रोजी पॅरिस येथे झालेल्या न्यू मिलेनियमसाठी कर्करोग विरुद्धच्या जागतिक कर्करोग शिखर परिषदेत करण्यात आली.[८]

संशोधनाला चालना देण्यासाठी, कर्करोग रोखण्यासाठी, रुग्ण सेवा सुधारण्यासाठी पॅरिस अगेन्स्ट कॅन्सरची सनद तयार करण्यात आली होती.[९] त्यामध्ये जागतिक कर्करोग दिन म्हणून स्थापित करणारा लेख देखील समाविष्ट होता, ज्यावर तत्कालीन युनेस्कोचे संचालक, कोचिरो मत्सुरा आणि तत्कालीन फ्रान्सचे अध्यक्ष जॅक शिराक ४ फेब्रुवारी २००० रोजी पॅरिसमध्ये या समिटमध्ये स्वाक्षरी केली होती.[१०]

संदर्भ संपादन

  1. ^ "World Cancer Day 2013 One-Pager (English)". UICC. Archived from the original on 2014-09-02. 2 February 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "World Cancer Day". World Health Organization (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 6 February 2017. 9 September 2018 रोजी पाहिले.
  3. ^ Nations, United (6 January 2015). "International Days". United Nations.
  4. ^ Szabo, Liz (3 February 2013). "World Cancer Day targets myths, spreads message". USA Today. 4 February 2016 रोजी पाहिले.
  5. ^ Gander, Kashmira (4 February 2016). "World Cancer Day: Why is the disease still a taboo?". The Independent. 4 February 2016 रोजी पाहिले.
  6. ^ Wheeler, Brad (27 January 2016). "Three international productions, including Scotland's The James Plays, to headline Luminato 2016". The Globe and Mail. 4 February 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "WCD | We Can. I Can". www.worldcancerday.org (इंग्रजी भाषेत). 9 September 2018 रोजी पाहिले.
  8. ^ "World Cancer day 2021: Cancer can be Cured by True Worship". S A NEWS (इंग्रजी भाषेत). 4 February 2021. 4 February 2021 रोजी पाहिले.
  9. ^ "World Summit Against Cancer for the New Millennium: Charter of Paris, 4 February 2000". UNESCO Digital Library.
  10. ^ "World Cancer Day: Why the Fourth of February?". ASCO Connection. 19 March 2012.

बाह्य दुवे संपादन