जवाहरलाल नेहरू स्टेडियम (दिल्ली)
(जवाहरलाल नेहरू स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
जवाहरलाल नेहरू स्टेडियम (इंग्लिश: Hampden Park) हे भारत देशाच्या दिल्ली शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ६०,००० आसनक्षमता असलेल्या ह्या स्टेडियमला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांचे नाव देण्यात आले आहे. भारतीय फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथे खेळतो.
जवाहरलाल नेहरू स्टेडियम | |
---|---|
स्थान | दिल्ली, भारत |
बांधकाम पूर्ण | इ.स. १९८२ |
पुनर्बांधणी | इ.स. २०१० |
आसन क्षमता | ६०,००० |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
२०१० राष्ट्रकुल खेळ भारत फुटबॉल संघ |
नेहरू स्टेडियम १९८२ साली आशियाई स्पर्धेसाठी बांधण्यात आले. २०१० राष्ट्रकुल खेळांसाठी ह्याची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली. आजवर येथे दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत. खेळांव्यतिरिक्त संगीत इत्यादी कार्यक्रमांसाठी देखील नेहरू स्टेडियम वापरले जाते.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत