जयसिद्धेश्वर स्वामी
डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (जन्म : १ जून १९५५) हे लिंगायत समाजाचे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थानाचे संस्थापक व मठाधिष्ठित धर्मगुरू आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या सोलापूर मतदारसंघातून निवडून गेले.[१] त्यांनी ह्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे, व प्रकाश आंबेडकर यांना हरवले.
जयसिद्धेश्वर स्वामी | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे, इ.स. २०१९ | |
मागील | शरद बनसोडे |
---|---|
मतदारसंघ | सोलापूर |
राजकीय पक्ष | भाजप |
जयसिद्धेश्वरस्वामी हे एम.ए. पीएच.डी आहेत.
स्वामींनी स्थापन केलेल्या संस्था
संपादन- अक्कलकोट येथे बी.बी.ए. (Bachelor of Business Administration) व बी.सी.ए. (Bachelor in Computer Application) महाविद्यालय
- गुरूसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र
- गौडगाव येथे मागासवर्गीय वसतिगृह
- गौडगाव येथे सांस्कृतिक केंद्र
- जगद्गुरूपंचाचार्य प्रशाला
- नूतन प्राथमिक मराठी शाळा
- यतेश्वर पब्लिक स्कूल
- शेळगी सोलापूर येथे शिवयोगीधाम हे आध्यात्मिक केंद्र
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "GENERAL ELECTION TO LOK SABHA TRENDS & RESULT 2019". भारतीय निवडणूक कमिशन.