जयराम हर्डीकर
जयराम हर्डीकर (जन्म:अज्ञात -५ एप्रिल १९८०) हे एक मराठी अभिनेते होते जे मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखले जातात.
जयराम हर्डीकर | |
---|---|
मृत्यू | ५ एप्रिल १९८० |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | सिंहासन (चित्रपट) |
पत्नी | शांभवी हर्डीकर |
अपत्ये | संज्योत हर्डीकर व अजून एक |
चित्रपट कारकीर्द
संपादन१९७९ मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन' या मराठी राजकीय नाटक चित्रपटात हर्डीकर यांच्या उल्लेखनीय चित्रपट भूमिका होत्या. तसेच नचिकेत पटवर्धन आणि शंकर नाग द्वारे लिखित '२२ जून १८९७' मध्ये त्यांनी गणेश द्रविडची नकारात्मक भूमिका निभावली होती. १९७८ मध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या सोबत 'सर्वसाक्षी' या मराठी चित्रपटात देखील काम केले होते.[१][२][३][४]
वैयक्तिक आयुष्य
संपादनजयराम हर्डीकर यांनी मराठी अभिनेत्री शांभवी हर्डीकर सोबत लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुली झाल्या. पैकी सावरखेड एक गाव या चित्रपटात भूमिका निभावणारी संज्योत हर्डीकर ही त्यांची एक मुलगी आहे.[१][४]
५ एप्रिल १९८० रोजी 'मंतरलेली चैत्रवेल' या नाटकासाठी प्रवास करत असताना मुंबई-गोवा मार्गावर त्यांच्या बसला अपघात झाला. यात जेष्ठ अभिनेत्री शांता जोग आणि इतर काही कलावंतांसह त्यांचा मृत्यू झाला.[१][४]
जयराम हर्डीकर यांच्या पत्नी अभिनेत्री शांभवी हर्डीकर यांनी जयराम यांच्या आठवणींना उजाळा देत 'तुझ्याशीच बोलत्येय मी' नावाचे एक पुस्तक १८ सप्टेंबर २०१३ रोजी लिहिले आहे. या पुस्तकाचे लिखाण रोजनिशी प्रमाणे आहे.[४][५]
संदर्भ
संपादन- ^ a b c "२ मार्च जेष्ठ अभिनेत्री शांता जोग यांचा जन्मदिन". सहज न्यूझ. १४ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "CINEMA CURRENT: State of corruption". Live Mint. HT Media Ltd. 2 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "The games politicians play". Times of India/. 2 March 2018 रोजी पाहिले.
- ^ a b c d "५ एप्रिल मराठी नाट्यचित्रसृष्टीतील एक देखणे, रुबाबदार नि भारदस्त अभिनेते जयराम हर्डीकर यांचा स्मृतिदिन". सहज न्यूझ. १५ एप्रिल २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ तुझ्याशीच बोलत्येय मी