जमशेदजी फ्रामजी मदन
जमशेटजी फ्रामजी तथा जे.एफ. मादन (१८५६ – १९२३) हे भारतीय चित्रपटव्यवसायाच्या आद्य प्रवर्तकांपैकी एक होते. त्यांनी एलफिन्स्टन बायोस्कोप कंपनीची स्थापना करून अनेक चित्रपटांचे निर्माण केले तसेच एलफिन्स्टन नावाचे कायम स्वरूपाचे पहिले चित्रपटगृह १९०७ मध्ये कोलकातामध्ये सुरू केले.