जगदीप (अभिनेता)

भारतीय अभिनेता
(जगदीप या पानावरून पुनर्निर्देशित)

जगदीप (जन्म : दतिया-मध्य प्रदेश, २९ मार्च १९३९; - मुंबई, ८ जुलै २०२०) हे हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध विनोदी नट होते. जगदीप यांचे खरे नाव सैयद इश्तियाक जाफरी आहे. त्यांनी ३००पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

जगदीप (अभिनेता)
जगदीप (अभिनेता)
जन्म जगदीप (अभिनेता)
२९ मार्च १९३९
दतिया-मध्य प्रदेश
मृत्यू ८ जुलै २०२०
मुंबई
इतर नावे सैयद इश्तियाक जाफरी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट शोले

जगदीप यांनी अभिनयास सुरुवात बाल कलाकार म्हणुन बी.आर. चोपरा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बाल कलाकार म्हणून त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्नाहम पंछी एक डाल के. त्यानंतर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटांद्वारे विनोदी भूमिकांस सुरुवात केली.

ए.व्ही.एम.चित्रपट निर्मिती कंपनीच्या चित्रपटांमध्ये जगदीप नियमित दिसू लागले. त्यांनी त्या कंपनीच्या पाच चित्रपटांत प्रमुख भूमिका असलेले चित्रपट केले. त्यांची विशेष गाजलेला अभिनय म्हणजे शोले चित्रपटातील सुरमा भोपाली. त्यांनी निर्माण केलेल्या एकमात्र चित्रपटाचे नाव सुरमा भोपाली होते. या चित्रपटानंतर अनेक जण त्यांना सुरमा भोपाली म्हणूनच ओळखू लागले होते.

अभिनेता जावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. त्यांचा दुसरा पुत्र नावेद जाफरी आहे. (नावेद व जावेद यांनी टी.व्ही.वर प्रसिद्ध नृत्य मालिका बुगी वुगी निर्माण केली आहे.)

जगदीप यांची भूमिका असलेले काही चित्रपटसंपादन करा

  • अंदाज अपना अपना
  • अफसाना
  • अब दिल्ली दूर नही
  • कुरबानी
  • दो बीघा ज़मीन
  • फिर वही रात
  • मुन्ना
  • शहनशाह
  • शोले
  • हम पंछी एक डाल के, वगैरे

बाह्य दुवेसंपादन करा