छोटा खरूचि, चिनी ससाणा, चिमण नारझी किंवा चिमण नारझिनक (इंग्लिश: Lesser Kestrel) हा एक पक्षी आहे.

चिनी ससाणा
चिनी ससाणा
Falco naumanni

ओळखणसंपादन करा

चिनी ससाणा हा पक्षी कबुतरापेक्षा आकाराने मोठा आहे. त्यात नराचे पंख मोठे असतात व त्यांचा रंग निळा करडा असतो. पोटाखालील भाग तांबूस पिवळट रंगाचा असतो. पंखांखालचा भाग पांढरा असतो. त्यावर कसलीही चिन्हे नसतात. मादी: अस्पष्ट मिशा ,आकार लहान आसतो .मादी हि बेधडकपणे उड्डाण करते. ती उडणारे कीटक हवेतच पकडते. मादी शुभ्र अथवा पिवळसर वर्णाची असते. ती फांदीवर बसून पंखांच्या सहाय्याने घास चोचीजवळ नेते. हे पक्षी थव्याने किंवा एकटेही राहतात.

वितरणसंपादन करा

गिलगीट हरियाना आणि नेपाळ ते आसाम व आजूबाजूच्या प्रांतात आढळतात. दक्षिणेकडे महाराष्ट्र (सोलापूर, अहमदनगर) तामिळनाडू, ओरिसा या भागात हिवाळ्यात आढळतात त्यामुळे त्यांना हिवाळी पाहुणे म्हणतात. तुर्कस्तान ते पूर्वेकडे मांचुरिया आणि उत्तर चीन मध्ये आढळतात.

निवास्थानेसंपादन करा

माळराने, गवती कुरणे आणि शेतीच्या प्रदेशात आढळतात.

संदर्भसंपादन करा

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली