चौरगड किल्ला

(चौल्हेर या पानावरून पुनर्निर्देशित)


चौरगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यात असलेला हा किल्ला चौल्हेर किंवा चाल्हेरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो.

चौरगड
नाव चौरगड
उंची मी.
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}

भौगोलिक स्थान संपादन

कसे जाल ? संपादन

पोहोचण्याच्या वाटा :

मुंबई - पुण्याहून नाशिक मार्गे ९५ कि. मी. वरील सटाणा गाठावे. सटाण्यावरून (१५ किलोमीटर) तिळवणला जाणारी एसटी पकडावी. तिळवणपासून २० मिनिटांवर असणाऱ्या वाडी चौल्हेर गावात पोहचावे. वाडी चौल्हेर हे पायथ्याचे गाव. गावातच किल्ल्याला लागून असलेल्या डोंगराची डोंगरसोंड उतरते. याच डोंगरसोंडेवरून चालत दीड तासात गडमाथा गाठता येतो. खाजगी गाडीने थेट गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. वाडी चौल्हेर गावातून कच्च्या रस्त्याने किल्ल्याला लागून असलेल्या डोंगराच्या डोंगरसोंडेपर्यंत जाता येते.

राहाण्याची सोय :

गडावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय :

गडावर जेवणाची व्यवस्था नाही., जेवणाची व्यवस्था आपण स्वतः करावी.

पाण्याची सोय :

मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :

वाडी चौल्हेरवरून दीड तास लागतो.

इतिहास संपादन

मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार चौल्हेर (Chaulher) किल्ल्याची ऊंची : 3700 फुट, 1128 मीटर किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बागलाण जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम किल्ले चौल्हेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला य़ा नावाने देखील ओळखला जातो. किल्ले चौल्हेर हा साल्हेरचा जुळा भाऊ आहे. चौल्हेरचा आकार हा साधारणपणे साल्हेरशी साधर्म्य दाखविणारा आहे. चौल्हेर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना पाहाण्यासारखी आहे. चौल्हेर किल्ल्यावर दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पिठुरी अमावस्येला जत्रा भरते.

9 Photos available for this fort	

पहाण्याची ठिकाणे :

वाडी चौल्हेर गावाच्या मागे चौल्हेर किल्ला आहे. गावातून गडावर जाण्यासाठी दोन टेकड्या पार कराव्या लागतात. गावा जवळील टेकडीच्या पायथ्याशी एक कमान उभारलेली आहे. या टेकडीवर चढून जाण्यास १० मिनिटे लागतात. या टेकडीवर वनखात्याने पर्यटकांसाठी सिमेंटचे विश्रांतीस्थान बांधलेली आहेत. या टेकडीच्या समोरील डोंगराच्या डाव्या बाहूने वळसा घालून एक ठळक पायवाट जाते. दरी उजवीकडे आणि डोंगर डावीकडे ठेवत या पायवाटेने २० मिनिटात आपण किल्ल्याच्या डोंगरा समोरील छोट्याश्या पठारावर पोहोचतो. येथून समोरच किल्ल्याचा बुरुज दिसतो. पठारावरून वाट खाली उतरते आणि किल्ल्याच्या डोंगराला लागते. या वाटेवर भरपूर घसारा (स्क्री) आहे. किल्ल्याचा डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत किल्ला चढायला सुरुवात करावी. साधारणपणे अर्ध्या तासात आपण रेलिंगपाशी पोहोचतो. याठिकाणी रेलिंग लावून दरीकडील बाजू सुरक्षित केलेली आहे. रेलींग संपल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या पार केल्या की आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या खाली पोहोचतो.

प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वाट काटकोनात वळते . काही पायऱ्या चढल्यावर दुसरा दरवाजा आहे. पुन्हा वाट काटकोनात वळते तेथे तिसरा दरवाजा आहे. पायऱ्या चढून वर गेल्यावर चौथा दरवाजा लागतो. हे सर्व दरवाजे अशा प्रकारे बांधलेले आहेत की या प्रवेशद्वार संकुलात फ़ारसा प्रकाश येणार नाही. त्यामुळेच या दरवाजांचा भूयारी दरवाजे असा उल्लेख केलेला आढळतो. चौथ्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आपला माचीवर प्रवेश होतो. उजव्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. त्याच्या पुढे पाचवा दरवाजा होता पण आज तो अस्तित्वात नाही. या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर एक पूर्ण झिजलेली मुर्ती आहे. दरवाजा समोरून गड माथ्यावर जाणारी वाट आहे . तर उजव्या बाजूला पिंड, नंदी आणि मंदिराच्या खांबाचे अवशेष उघड्यावर ठेवलेले आहेत. या अवशेषांच्या पुढे टोकावर जाऊन खाली पाहिल्यावर एक टाक दिसते. हे सर्व अवशेष पाहून गडमाथ्याकडे न जाता विरुद्ध बाजूला जावे. याठिकाणी लांबलचक पसरलेले पठार आहे. मध्यभागी एक उंचवटा आहे. त्यावर वास्तूचे अवशेष आहेत. या उंचवट्या खाली उजव्या बाजूला पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या पुढे पठाराच्या टोकाला बुरुज आहे. किल्ल्यावर येण्याच्या वाटेवरून हाच बुरुज आपल्याला सतत दिसत असतो.

किल्ल्याच्या माचीवरून परत फ़िरून प्रवेशद्वारापाशी येऊन गड माथ्याच्या दिशेने चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून गेल्यावर समोरच एक पत्र्याची शेड लागते. त्या ठिकाणी एका साधूचे वास्तव्य आहे. या भागातून गडमाथ्याला पूर्ण फ़ेरी मारता येते. शेडच्या पुढे एक सिमेंटने बांधलेले चौरंगीनाथांचे मंदिर आहे. त्यात हनुमानाची मुर्ती आणि इतर झिजलेल्या मुर्ती आहेत. मंदिराच्या पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. टाक्याच्या खालच्या बाजूला एक बुरुज आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला चढून गेल्यावर गड माथ्याच्या कातळटोपी खाली पाण्यचे प्रचंड मोठे टाके आहे. सध्या त्यात दगड पडून ते भरलेले आहे. इथून पुढे जाणारी वाट ढासळलेली असल्याने पुन्हा चौरंगीनाथ मंदिरापाशी यावे. इथून समोर किल्लाची माची दिसते. त्या माचीच्या खालच्या अंगाला एक टाके खोदलेले आहे. चौरंगीनाथ मंदिराच्या पुढे असलेल्या साधूच्या कुटीच्या पुढे पायवाट गड माथ्यावर चढत कातळभिंतीपाशी येते. इथे उजव्या बाजूला मोती टाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मोती टाके पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर कातळात कोरलेली दोन टाकी बाजूबाजूला आहेत. टाक्यांच्या पुढे गडमाथ्यावर (बाले किल्ल्यावर) जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर उध्वस्त प्रवेशद्वारातून आपला गडावर प्रवेश होतो. प्रवेशद्वाराचे नक्षीदार दगड तिथे विखूरलेले पाहायला मिळतात. गडमाथ्यावर डाव्या बाजूला एक वास्तू आहे. त्याच्या तळघरात धान्य कोठार आहे. त्याच्या बाजूला वास्तूचा चोर दरवाजा आहे. ही मोठी वास्तू पाहून गडमाथ्यावर आल्यावर इतरही काही उध्वस्त वास्तू दिसतात. पण त्यात माजलेल्या झाडझाडोऱ्यामुळे आणि निवडुंगामुळे वास्तूत प्रवेश करता येत नाही. गडमाथ्यावर मध्यभागी कातळात कोरलेली पाण्याची टाकी आहेत. टाक्यांजवळ असलेल्या उंचवट्यावर ध्वजस्तंभ लावलेला आहे. बालेकिल्ल्याच्या तटबंदीला असलेल्या दुसऱ्या दरवाजातून आपण बाहेर पडतो आणि बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो . याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण गड फिरण्यास दोन तास पुरतात.

छायाचित्रे संपादन

गडावरील राहायची सोय संपादन

गडावर राहण्याची सोय नाही.

गडावरील खाण्याची सोय संपादन

गडावर जेवणाची व्यवस्था नाही.,

गडावरील पाण्याची सोय संपादन

पाण्याची सोय : मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे.

गडावर जाण्याच्या वाटा संपादन

मार्ग संपादन

जाण्यासाठी लागणारा वेळ संपादन

वाडी चौल्हेरवरून दीड तास लागतो.

संदर्भ संपादन

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

हे सुद्धा पहा संपादन