फ्रान्सचा चौथा फिलिप
(चौथा फिलिप, फ्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)
फिलिप चौथा (१२६८ - २९ नोव्हेंबर, १३१४) हा तेराव्या आणि चौदाव्या शतकातील फ्रांसचा राजा होता. हा तिसऱ्या फिलिप मुलगा असून त्याच्या मृत्यूनंतर हा सत्तेवर आला. याच्या राज्यकाला दरम्यान तूर दे नेस्लेचे लफडे बाहेर आले. यात फिलिपच्या तीन सुनांवर व्यभिचाराचा आरोप केला गेला. याचे पर्यवसान मृत्युदंड, तहहयात कैद आणि इतर शिक्षांमध्ये होउन याचा दूरगामी परिणाम फ्रांसच्या राजघराण्यातील स्त्रीयांवर झाला.
याच्यानंतर त्याची तीन मुले एकामागोमाग फ्रांसच्या राजेपदी आले.
मागील तिसरा फिलिप |
फ्रांसचा राजा ५ ऑक्टोबर, इ.स. १२८४ – २९ नोव्हेंबर, १३१४ |
पुढील दहावा लुई |