कोल्हापूरची श्री महालक्ष्मीतुळजापूरची भवानी माता आणि पुण्याची चतुःशृंगीदेवी या प्रमाणेच कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र बदामी येथील प्रसिद्ध श्री बनशंकरी (शांकभरी) देवी तीन अद्यापीठांपैकी एक मानली जाते. हे मंदिर सुमारे २५० वर्षापूर्वीचे आहे ,या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आटल जगद्गुरू श्री शंकराचार्य यांनी केले आहे.

मंदीर परिसर
मंदिराच्या आतील नाक्षी

इतिहास

संपादन

चौडेश्वरी देवी ने दुष्काळात आपल्या शरीरात शांकभाजी निर्माण करून भक्तांना तारले म्हणून तिला शंकभरी असेही म्हणतात. तसेच तीर्थक्षेत्र बदामी येथे बनाच्या रम्य परिसरात स्थायिक झाल्यामुळे बनशंकरी असेही संबोधतात. या देवीचे अखिल भारतातील देवांग हटवार कोष्टी समाजाची श्री बनशंकरी देवी ही कुदैवत मनाली जाते. देवीचे प्रारूप सोलापूर येथील साखरपेठ येथे आहे.

वास्तू

संपादन

सदर मंदिर हेमाडपंथी असून या देवाचे सभामंडप प्राचीन असून अत्यंत आकर्षक आहे. सभा मंडपात डाव्या बाजूस दुर्गा मातेचे चित्र रेखाटले आहे. तर उजव्या बाजूस श्री पार्वती माता आणि शंकराचे चित्र रेखाटले आहे.

मूर्ती: या देवीची मूर्ती काळ्या पाषाण दगडाची आहे. मूर्ती रेखीव आणि तेजस्वी आहे. मूर्ती चतर्भुज असून सिंहावर आरूढ झालेली आहे. बनशंकरी देवीने आपल्या हातात त्रिशूल ,डमरू ,तलवार , अमृतकलश इ. आयुधे धारण केली असून एका हातामध्ये ग्रंथ/पुस्तक आहे. हे देवीचे स्वरूप उग्र आहे .या देवीस कुंकूमार्चंन केले असता अखंड सौभाग्यवती प्राप्त होते. या देवीच्या डाव्या बाजूस उजव्या सोंडेच्या कृपाभिलाषी गणपतीची मूर्ती असून उजव्या बाजूस श्री शंभु महादेवाचे लिंग आहे.

उत्सव: सोलापुरातील भक्तगण बदामी येथे जात असल्यामुळे माघ पौर्णिमेला सोलापूर येथे बनशंकरी देवीची यात्रा भरते या यात्रेला रथाची व नंदिध्वजासह मिरवणूक निघते.यावेळी सर्व समाजातील समाज असंख्य भक्तगण मिरवणुकीला हजर राहतात. नवरात्रीमध्ये अश्विनशुक्ल प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत दररोज रुद्राभिषेक तसेच  महापूजा कुंकूमर्चंन करून सामुदायिक आरती केली जाते. 

विशेष : विलंबाने लग्न होत असलेल्या मुलींना दार शुक्रवारी देवीस गजरा अर्पण केलेस ,त्यांचे विवाह जमतात असा बऱ्याच भक्तांचा अनुभव आहे. त्याप्रमाणे संकट निवारणासाठी राहू काळामध्ये दर शुक्रवारी लिंबाची आरती केल्यास संकट निवारण होते ,याची प्रचिती ही बऱ्याच लोकांना आली आहे .[ संदर्भ हवा ]