चेन्नईमधील वाहतूक

(चेन्नैतील वाहतूक व्यवस्था या पानावरून पुनर्निर्देशित)

चेन्नई ह्या भारत देशाच्या एक प्रमुख शहरामधील वाहतूक रस्ते, रेल्वे, सागरी व हवाई ह्या माध्यमांवर आधारित आहे.

चेन्नईमधील वाहतूकीचा नकाशा

मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ही संस्था चेन्नई महानगरामध्ये सार्वजनिक परिवहन सेवा चालवते. एम.टी.सी.चे सुमारे ७७० मार्ग असून दररोज अंदाजे ४९ लाख प्रवासी ही सेवा वापरतात.

रेल्वे

संपादन

चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक हे दक्षिण भारतामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. चेन्नईमधील उपनगरी रेल्वे वाहतूक चालवण्याची जबाबदारी चेन्नई उपनगरी रेल्वेवर आहे. जलद परिवहनासाठी चेन्नई मेट्रो बांधण्यात येत आहे. चेन्नई इग्मोर रेल्वे स्थानक हे चेन्नईमधील दुसरे एक वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे.

हवाई वाहतूक

संपादन

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा चेन्नई शहरामधील प्रमुख विमानतळ असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा येथूनच चालवल्या जातात.