क्षेत्रीमायुम इंदिरा देवी ज्यांना चिरोम इंदिरा म्हणून देखील ओळखले जाते, या एक भारतीय उद्योजक, परिकल्पक (डिझाइनर) आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

चिरोम इंदिरा
जन्म मणिपूर, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारत भारतीय
शिक्षण पदवीधर (राज्यशास्त्र)
प्रशिक्षणसंस्था 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर टेक्नॉलॉजी' येथून विणकाम परिकल्पक
पेशा परिकल्पक (डिझाइनर)
पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार

वैयक्तिक जीवन

संपादन

चिरोम यांचा जन्म मणिपूर येथील पश्चिम इम्फाल जिल्ह्यात झाला. आपल्या आई-वडिलांच्या सहा आपत्यात त्या सर्वात मोठ्या आहेत.[] चिरोम ह्या राज्यशास्त्रात पदवीधर आहेत तसेच त्यांनी गुवाहाटी येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर टेक्नॉलॉजी'मध्ये 'विणकाम' विषयाचे प्रशिक्षण घेतले. त्यांची पहिली नोकरी १९९४ मध्ये जवळच 'गोएंका वूलन मिल्स लि.' येथे होती.

इ.स. २००३ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या पतीने हातमागावरील उत्पादनांसाठी एक निर्यात कंपनी स्थापन केली.[]

इ.स. २०१५ मध्ये वस्त्र मंत्रालयाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्या हातमाग उत्पादनांच्या डिझाईन डेव्हलपमेंटमधील 'राष्ट्रीय पुरस्काराची पहिली भारतीय प्राप्तकर्ता महिला' बनल्या.[]

आंतरराष्ट्रीय महिला दिनी चिरोम यांना त्यांच्या हातमाग विणकामासाठी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[][] भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्या वर्षी सुमारे ३० लोक आणि नऊ संस्थांना सन्मानित करण्यात आले, त्यांना प्रत्येकी १,००,००० ₹चे बक्षीस आणि पुरस्कार पदक मिळाले.[][] त्या दिवशी सन्मानित आणखी एक व्यक्ती म्हणजे 'मधु जैन' जो कापडातही प्रावीण्य मिळवत होता.[] त्या पुरस्काराच्या दिवशीच पंधरा महिलांसाठी 'वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवॉर्ड' साठीचे नामांकन त्यांनी दाखल केले होते आणि त्या वर्षाच्या उत्तरार्धात त्यांना हा पुरस्कार देखील देण्यात आला होता.[]

इ.स. २०१८ पर्यंत त्या "ऑल इंडिया हँडलूम बोर्ड"[]च्या सदस्या बनल्या होत्या. काही कारणाने इ.स. २०२० मध्ये हे बोर्ड बरखास्त करण्यात आले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c "Kshetrimayum Indira Devi of Manipur conferred Women Transforming India Award 2018 by NITI Aayog & United Nations India | Times Of Manipur %". Times Of Manipur (इंग्रजी भाषेत). 2018-12-17. 2021-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Chirom Indira Promoter of Manipuri Handlooms products". e-pao.net. 2021-01-15 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Manipur's Chirom Indira awarded Nari Shakti Puraskar 2017". NORTHEAST NOW (इंग्रजी भाषेत). 2021-01-15 रोजी पाहिले.
  4. ^ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-13 रोजी पाहिले.
  5. ^ "On International Women's Day, the President conferred the prestigious Nari Shakti Puraskars to 30 eminent women and 9 distinguished Institutions for the year 2017". pib.gov.in. 2021-01-14 रोजी पाहिले.
  6. ^ "International Women's Day: President Kovind honours 39 achievers with 'Nari Shakti Puraskar'". The New Indian Express. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-08 रोजी पाहिले.
  7. ^ "Madhu Jain Honoured by Ministry of Textiles' Award for Special Recognition in Textile Sector - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-01-16 रोजी पाहिले.
  8. ^ "Why was the All India Handloom Board dissolved?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-09-05. 2021-01-15 रोजी पाहिले.