चिकारा
चिंकारा याच्याशी गल्लत करू नका.
चिकारा हे एक तंतुवाद्य होते. ते दिसायला सारंगीसारखेच होते, मात्र तिच्याहून ते लहान असायचे. यामध्ये एका चर्मवेष्टित पेटीला एक पोकळ व लांब लाकडी ठोकळा जोडतात. त्यावर तातीच्या तीन तारा व धातूच्या पाच तारा बसवतात. तातीच्या तारा षड्ज, मध्यम व पंचम या स्वरांत व धातूच्या तारा षड्ज, ऋषभ, पंचम, धैवत व निषाद या स्वरांत लावतात. गजाच्या सहाय्याने हे वाद्य वाजविले जायचे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |