चिंचपेटी हा महाराष्ट्रात वापरला जाणारा स्त्रीयांचा एक अलंकार आहे. हा कोल्हापुरी साजाचा भाग आहे. चिंचपेटी मोत्याची असते. तो ठुशीप्रमाणेच गळ्याभोवती घट्ट बसतो.

चिंचपेटी

चिंचपेटी हा खास मराठमोळा दागिना आहे. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून तो प्रचलित असावा. अनेक जुन्या काव्यातूनही चिंचपेटीचा उल्लेख आढळतो. चिंचेच्या पानाचा आकार असलेल्या सोन्याच्या पेट्यांवर मोत्याचे किंवा हिऱ्याचे कोंदण करून व त्या पेट्या रेशमाने पटवून केलेला, वज्रटीकेसारखा गळ्यालगत बसणारा अलंकार. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरात पेशवाईत रुक्मिणीला दिलेल्या चार चिंचपेट्या पहायल्या मिळतात.