चावडा घराणे
चावडा, चापोत्कट, चाहुडा तथा चावोटक हे पश्चिम भारतातील गुजरात प्रदेशाचे राज्यकर्ते होते. पंचसर आणि नंतर अणहिलवाड पाटण ही यांची राजधानी होती.
चावडा साम्राज्य | |
---|---|
[[चित्र:| px]] [[चित्र:|250 px]] | |
~इ.स. ६९० - इ.स. ९४२ | |
राजधानी | पंचसर, अणहिलवाड पाटण |
राजे |
जयशेखर चावडा वनराज चावडा |
भाषा | गुजराती, प्राकृत |
क्षेत्रफळ | ११,००,००० वर्ग किमी |
याची स्थापना जयशेखर चावडाने केली परंतु ६९७ मध्ये पंचसरवरील हल्ल्यात जयशेखर मारला गेला. त्याचा मुलगा वनराज याने आठव्या शतकाच्या मध्यात अणहिलवाड पाटण हे राजधानीचे शहर वसवले व या राजवंशाची पकड बळकट केली. दोन शतकांनतर मूळराजने चावडा वंशाला पदभ्रष्ट करून चालुक्य वंशाची सत्ता गुजरातमध्ये बसवली.
राज्यकर्ते
संपादन- जयशेखर चावडा
- वनराज चावडा - ७६५-७८०
- योगराज चावडा - ८०६-८४१
- रत्नादित्य चावडा - ८४२-८४५
- वैरीसिंग चावडा - ८४५-८५६
- क्षेमराज चावडा - ८५६-८८०
- चामुंडराज चावडा - ८८१-९०८
- गगधराज चावडा - ९०८-९३७
- भूपतराज चावडा - ९३७-९६१
नोंद: ९४२मध्ये सत्ता संपुष्टात