चार्ल्स पेरॉट (१२ जानेवारी, इ.स. १६२८:पॅरिस, फ्रांस - १६ मे, इ.स. १७०३) हा फ्रेंच लेखक आणि विचारवंत अनेक परीकथांचा जनक होता.

पेरॉटचा जन्म पॅरिसमध्ये एका श्रीमंत घरात झाला. उत्तम शाळेत शिक्षण झाल्यानंतर त्याने कायद्याची पदवी घेतली. सरकारी नोकरी करीत अस्ताना त्याने विज्ञान अकादमीच्या स्थापनेसाठी व चित्रकला संस्थेच्या पुनर्उभारणीत त्याने पुढाकार घेतला. फ्रांसचा राजा १४वा लुईे यांच्याकडे काम करताना त्याने राजधानी व्हर्सायच्या राजवाड्याच्या बांधणीसाठी सल्ला दिला होता.

नोकरीतून निवृत्त झाल्यावर पेरॉट लिखाणाकडे वळला. वयाच्या साठीत असताना त्या काळातील साहित्यात वेगळा, नावीन्यपूर्ण ठरणारा प्रयोग त्याने केला. जगभरात सांगितल्या जाणाऱ्या कथांमधील काही घटक घेऊन त्याने त्यांना आधुनिक रूप दिले आणि प्रथमच परीकथा निर्माण केल्या.

टेल्स ऑफ मदर गूज, यासारख्या त्याच्या सुरुवातीच्या कथांमधून फ्रांसमधील परंपरा, संस्कृती दिसते. ’सिंड्रेला‘, ’लिटिल रेड रायडिंग हूड‘, ’स्लीपिंग ब्यूटी‘, पुस इन द बू्ट्स या कथांनी त्याला जगभर ओळख मिळवून दिली आणि त्याच्या या साहित्यकृती अमर झाल्या.