चर्चा:सोलापूर जिल्हा
जोडलेली ऑडिओ क्लिप ही सोलापूरचा उच्चारण संबंधी होता, त्यामुळे बदलला. सचिन १०:५८, २३ जानेवारी २०१२ (UTC)
- इतरत्र सापडलेला मजकूर योग्य संपादने करुन येथे समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) २२:११, १९ मार्च २०१८ (IST)
सोलापूर जिल्ह्यात दलित चळवळ आपल्या लेखांमधून जागृत ठेवण्याचे कार्य स्त्रियांनी केले आहे आत्मकथनांमधून जे भोगले अनुभवले व पाहिले ते लिहिले. अशा लेखिकांची माहिती :-
१. शांताबाई कांबळे : ह्या स्त्रीने लिहिलेले आत्मकथन हे दलित साहित्यातील पहिले आत्मकथन असून त्याचे नाव “माझ्या जल्माची चित्तरकथा” असे असून ते १९८६मध्ये प्रकाशित झाले. या साहित्यिकेचे मूळ नाव नाजुका होते. त्या १५ जानेवारी १९४२ रोजी कुरडवाडी गावातील शाळेमध्ये शिक्षिका झाल्या आणि १९८०मध्ये शिक्षणाधिकारी पदापर्यंत जाऊन सेवानिवृत्त झाल्या. माझ्या जल्माची चित्तरकथा या पुस्तकावर आधारित मुंबई दूरदर्शन वर नाजुका नावाची मालिका प्रसारण होत होती. ती एक चेतनामय संघर्षमय कथा होती. शांताबाई इतर सर्वसामान्य दलित स्त्रियांपेक्षा वेगळ्या होत्या. शांताबाईंनी भोगले, सहन केले, झुंज दिली व त्यामधून यशस्वीरीत्या मार्ग काढला. ही कथा समस्त स्त्री जातीला प्रेरणा देणारी आहे.
२. मुक्ता सर्वगोड ह्यांचे “मिटलेली कवाडे” हे आत्मकथन सन १९८२ साली प्रसिद्ध झाले. ही परिवर्तनासाठी धडपडणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्तीची आत्मकहाणी आहे. ही स्त्री दलित म्हणून जन्माला आली, पण संस्काराने दलित नव्हती. मागासलेपणा, शिक्षणाविषयी त्यांची उदासीनता, आर्थिक स्थिती व गुलाम इत्यादीचे मर्यादित पण बोलके उदाहरण वर्णन करून समाजाच्या उद्धारासाठी केलेल्या प्रयत्नाचे वर्णन या आत्मकथनात आहे.
३. मल्लिका अमर शेख : “मला उद्ध्वस्त व्हायचंय” हे त्यांचे आत्मकथन असून त्यात त्या मनात दाटलेल्या असंख्य प्रश्नांना मोकळी वाट करून देतात. शांत जगण्यापेक्षा उध्वस्तपणा स्वीकारून जगणे केव्हाही चांगले असे मत त्या मांडतात.
४. गंगूबाई एदाळे : ह्या नगरपालिकेच्या शाळेत एक प्राथमिक शिक्षिका होत्या. “लढा आयुष्याशी” हे त्यांचे आत्मकथन आहे. गंगूबाई एदाळे यांनी समाजातील स्त्रियांच्या व्यथा, वेदना यांना वाचा फोडून आत्मकथनांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रीने उच्च विद्याविभूषित होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ती कोणावरही अवलंबून नराहू नये असे त्यांना वाटत होते, समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांना बळी पडू नये असे वाटत होते.
५. विमल मोरे : “तीन दगडाची चूल” हे त्यांचे आत्मकथन आहे. अज्ञानाच्या व अंधश्रद्धेच्या अंधारात गुरफटलेल्या आणि रूढी-परंपरेच्या चक्रात अडकलेल्या भटक्या-विमुक्त समाजातील गोंधळी या जातीच्या विमल मोरे बालपणापासून अत्याचार, अन्याय, अवहेलना सहन करत मोठ्या होत गेल्या. या जमातींमध्ये स्त्रियांच्या वाट्याला आलेले नरकमय जीवन विमल मोरे जगत होत्या आणि अनुभवत होत्या. विमल मोरे एका पालाहून दुसऱ्या पालावर जाताना होणाऱ्या हालांचे वर्णन केले आहे. पाला वर आलेले वेगवेगळे त्ंनी आत्मकथनातून मांडले आहेत.
मराठी साहित्यामध्ये दलित आत्मकथनांनी खाजगी आणि महत्त्वपूर्ण अशी ओळख निर्माण केली. याच आत्मकथनांद्वारे दलित स्त्रीच्या जीवनातील अनुभव रेखाटले आहेत. दलित स्त्रियांची स्थिती कशी होती याचे विवेचन त्यांच्या आत्मकथनांमधून पाहावयास मिळते.
सोलापूर शहरामधील दलित स्त्रियांचे लेख
संपादनआंबेडकरी चळवळीत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही भाग घेतला होता. त्या साहित्यक्षेत्रातही मागे नव्हत्या नव्या विचारांचे अस्मितेचे पदर त्यांच्याही मनाला सुटले होते, फुटले होते आपल्या भावभावना व्यक्त करण्याची ऊर्मी त्यांच्या मनात दाटली होती. त्यामुळे स्त्रियांना ज्या ज्या वेळी संधी मिळाली. त्या-त्यावेळी स्त्रिया लिहू लागल्या,बोलू लागल्या. स्त्रियांच्या विचारास बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांमधून संधी मिळाली. पुढे मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, नाशिक शहरांमधून काही स्त्रिया साहित्यिका म्हणून नावारूपास आल्या. स्त्रियांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या होत्या. साहित्य, राजकारण, शिक्षण, रूढी, परंपरा इत्यादीबाबत त्या बारकाईने निरीक्षण करून आपले विचार व्यक्त करू लागल्या.
सामाजिक प्रश्नावर विचार करणाऱ्या स्त्रिया धार्मिक संस्कारांत सुधारणा व्हावी म्हणून विचार करीत होत्या व त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत होत्या.
शारदा शेवाळे या स्त्रीने आपल्या समाजातील अंत्यसंस्कारांच्या रूढीविषयी “अस्पृश्यांनी त्यांची आपली प्रेते पुरू नयेत तर जाळावीत”. अशा आशयाचा लेख जनता साप्ताहिकात २४ आॅक्टोबर १९३३ रोजी प्रसिद्ध केला. या लेखावर अनेक स्त्रियांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 1. द्रोपदी बाई बापू कांबळे या अध्यक्ष महिला मंडळ सोलापूर यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की , ब्राह्मण आणि लिंगायत या दोन उच्चवर्णीय जातीपैकी ब्राम्हण जातीत प्रेते जाळतात तर लिंगायत जातीत प्रेते पुरतात. मग प्रत्येक पुरल्या बद्दल अस्पृश्यांना दोष का शिवाय प्रेते पुरण्यापेक्षा जाळण्यास जास्त खर्च येतो. 2. शांता रामचंद्र जाधव यांनी शारदा शेवाळे यांच्या मताबद्दल आश्चर्य व्यक्त केले, ते पुढीलप्रमाणे आम्ही संस्कार करणे उत्तम हे फक्त उच्चवर्णीय हिंदूच मानतात. जगातील बहुसंख्यक धर्मातील लोक प्रेताला agniदेत नसून फक्त पुरतात. कारण हा देह मातीचा आहे. तो मातीत विलीन करायला हवे.
शारदा शेवाळे आपल्या लेखनावर किंवा लेखावर प्रसिद्ध झालेल्या पत्रव्यवहाराचा परामर्श घेताना म्हटले की, माझ्या विषयी गैरसमज झाले आहेत. माझा मूळ हेतू असा होता की, राजकारणात आपला समाज बराच पुढ मागे आहे. मृत्यू संस्कारात गडण्याऐवजी जाळावी. यामध्ये आर्थिक अडचण ती कोणती नाहीतरी अकराव्या दिवशी पाण्यासारखा पैसा खर्च करतातच ना मेलेल्या माणसाचे शरीर जाळल्यानंतर दुसरे प्रेत त्याच जागेवर जाळण्यात येते. परंतु प्रेत पुरल्याने असे करता येत नाही. सबब रूढी बदलायलाच हवे.
अशा तऱ्हेने होतोये चर्चेत स्त्रिया सहभाग घेऊ लागल्या.