चर्चा:सु.ल. गद्रे

Latest comment: ९ वर्षांपूर्वी by अभय नातू

गद्रे यांची नेमकी उल्लेखनीयता काय होती? या लेखाचे वर्गीकरण कसे करावे?

वरील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास लेखात योग्य ते बदल करता येतील.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १०:३८, २८ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply


सु.ल गद्रे ही सर्वसाधारण व्यक्ती नव्हती; त्‍यांच्या निधनानंतर किमान तीन मराठी वृत्तपत्रांत त्यांच्यासंबंधी काही लेख प्रकाशित झाले होते. मुलुंडमध्ये लोक त्यांचे नाव, कार्य यांच्याशी चांगल्या प्रकारे परिचित होते. सु.ल. गद्रे यांच्या नावाने दिले जात असलेले पुरस्कार हे महाराष्ट्रात प्रतिष्ठेचे पुरस्कार समजले जातात. ते उद्योजक होतेच, पण त्यांना उद्योगपती म्हणावे की नाही याबद्दल शंका असली तरी ते समाजसेवक नक्की होते..लेखातील माहितीवरून वर्गीकरण काय असावे, हे ठरवता यावे.

विकीवर वापरात असलेल्या वर्गांची यादी मिळाली तर तिच्यामधून निवड करता येईलसे वाटते.. (चर्चा) १४:३२, २८ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

ज,
मुलुंडपल्याड त्यांची ख्याती काय होती? आपण त्यांचा उल्लेख उद्योजक म्हणून केला तर त्यांचे व्यवसाय/उद्योग काय होते? त्यांच्या समाजसेवेचा फायदा/उपयोग कोणास झाला? हे लेखात विषद करावे. वृत्तपत्रांतील लेख काय आशयाचे होते हे कळले तर त्यांची नेमकी उल्लेखनीयता अधिक सरळरीत्या कळून येईल. लेख व आपल्या स्पष्टीकरणातून याचा अर्थबोध अजूनही होत नाही आहे.
अभय नातू (चर्चा) २०:०५, २८ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

सु.ल. गद्रे डीएसकेंप्रमाणे एक बांधकाम व्यावसायिक होते. त्यांच्याच प्रमाणे ते लोककल्याणाबद्दल जिव्हाळा असणारे फिलॅन्थ्रॉपिस्ट होते, एवढेच सांगता येईल. मुलुंडपड्याल त्यांची कितपत ख्याती होती ते माहीत नाही, पण त्यांनी उदयास आणलेल्या संस्थांमुळे आणि ठेवलेल्या पुरस्कारांमुळे ते उर्वरित महाराष्ट्रास ठाऊक असत.

गद्र्‍यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात "मुंबईतील उपनगरांची स्वतंत्र ओळख तयार करण्याचे कार्य केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात वावरणार्‍या ज्या प्रतिभावंतांनी मोठ्या प्रमाणावर केले, त्या प्रतिभावंतांमध्ये सुधाकर लक्ष्मण गद्रे अर्थात सु. ल. गदे यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे." असे वाक्य आहे. आपल्याकडे Philanthropist असा वर्ग असेल तर त्या वर्गात सु.ल. गद्र्‍यांवरचा हा लेख टाकता येईल.

अर्थात हा मजकूर वाचूनही गद्रे पुरेसे ’मोठे’ वाटत नसतील तर विकीवरून हा लेख काढून टाकायला हरकत नाही.... (चर्चा) २३:१८, २८ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

वरील माहितीवरून लेखात बदल केले आहेत.
प्रश्न मोठे वाटण्याचा नसून अचूक व विश्वकोशीय माहिती (शक्य तितकी) ठेवण्याचा आहे. अलंकारिक भाषेत कोणास नावाजण्यापेक्षा त्यांचे कार्य व महत्व विषद केले असता वाचणाऱ्यास अधिक माहिती मिळते.
आपण अशा (कदाचित) अतिप्रसिद्ध नसलेल्या परंतु महत्वाच्या व्यक्तींबद्दलची माहिती मिळवून येथे घालीत आहात त्याबद्दल आपले धन्यवाद. अशी माहिती घातली नाही तर कालौघात ती नष्ट होण्याची दाट शक्यता आहे तरी अधिकाधिक माहिती जरूर घालत रहावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) २३:३८, २८ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply
"सु.ल. गद्रे" पानाकडे परत चला.