[ कालसापेक्षता टाळा]

अलिकडे ‘सुबोध भावे’ने बालगंधर्व या चित्रपटात बालगंधर्वांची भुमिका केलेली आहे.
बालगंधर्वांच्या भूमिकेला १००% न्याय दिला आहे. बालगंधर्वांचे मुळ फोटो आणि सुबोधचे फोटो यांची तुलना होऊ लागली आहे.
हा व असा मजकूर एखाद्याचे वैयक्तिक मत आहे. तरी असे लिहीणे टाळावे.
प्रबोध १४:५३, १९ मे २०११ (UTC)

खुलासा संपादन

सुबोध भावेंनी केलेला अभिनय हा छानच आहे, परंतु त्यात कोठेही बालगंधर्वांना कमी लेखलेले नाही. जरी ते वैयक्तीत मत असले, तरी त्यात काही वाईट उल्लेख केलेला नाही.

Dr.sachin23 १६:२०, १९ मे २०११ (UTC)

डॉ. सचिन,
प्रश्न कमी-जास्त लेखण्याचा नसून व्यक्तिगत मते विश्वकोशात असण्याचा आहे. भावे यांनी भूमिकेला १००% न्याय दिला कि ७८%? १००% असे कोण म्हणले? हे म्हणणारे/लिहिणार्‍या व्यक्तीचा अधिकार काय (जसे व्यावसायिक नाट्य-चित्रसमीक्षक, अभिनेता, इ.)?
हे लिहिणे चुकीचे नसून त्याला संदर्भ न देता लिहू नये इतकचे.
भावे यांच्या फोटोची बालगंधर्वांशी तुलना कोणी केली, कधी केली हे लिहिले असता या वाक्याला अर्थ राहील. भावे यांची तुलना एलिझाबेथ टेलरशी होऊ लागली आहे असे लिहिल्याला जसा अर्थ नाही तसेच संदर्भ नसल्यास वरील वाक्यालाही फारसा नाही.
अभय नातू १७:४१, १९ मे २०११ (UTC)

माझी चुक लक्षात आली आहे, त्याबद्दल क्षमस्व, व मी टाकलेला मजकुर वगळत आहे.

Dr.sachin23 ०३:१७, २० मे २०११ (UTC)

"सुबोध भावे" पानाकडे परत चला.