चर्चा:द ग्रेटेस्ट इंडियन

(चर्चा:सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण) या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे

या लेखात बरेच निष्कर्ष नोंदविण्यात आलेले आहेत. परंतु या लेखाला जो एकमेव संदर्भ आहे, त्यांत यांचा उल्लेख नाही. तसेच पहिल्याच ओळीत 'DrBR Ambedkar, India's first Law Minister, was recently voted as the greatest Indian after Gandhi in an online poll.' असे लिहिले आहे. त्यामुळे कोणत्या आधारावर हा लेख लिहिला आहे याची संपादकांनी माहिती द्यावी. याच लेखाचा उल्लेख करून बाबासाहेब आंबेडकर या लेखातही वरील एकमेव संदर्भ देऊन अनेक विधाने केली आहेत.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:१६, २४ मार्च २०१८ (IST)Reply

आवश्यक त्या ठिकाणी संदर्भ जोडतो.--संदेश हिवाळेचर्चा १६:०८, २४ मार्च २०१८ (IST)Reply

संदर्भ जोडल्याबद्दल धन्यवाद. सर्वेक्षण हे 'महात्मा गांधी यांच्यानंतरचा महान भारतीय' या संकल्पनेवर होते. त्यामुळे तसा स्पष्ट उल्लेख करायला हवा. लेखाचे शीर्षकही त्याप्रमाणे बदलायला हवे असे वाटते.आयोजकांच्या निवेदनात स्पष्ट केलेले आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:०५, २४ मार्च २०१८ (IST)Reply

शीर्षकासंदर्भात इंग्रजी विकी वरील लेख पाहावा. ही विनंती प्रसाद साळवे (चर्चा) १९:१६, २४ मार्च २०१८ (IST)Reply
इंग्रजीत जे आहे ते योग्यच आहे असा नियम नाही. तथ्य पाहून, संदर्भ पडताळून चर्चेने निर्णय घेण्याची विकिपीडियाची पद्धत वापरुया.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:३४, २४ मार्च २०१८ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी:, सर्वेक्षणाचे अधिकृत नाव द ग्रेटेस्ट इंडियन हे आहे, द ग्रेटेस्ट इंडियन आफ्टर गांधी हे नव्हे. सर्वेक्षणाचा ‘लोगो’ पहा, तो पाहिल्यावर हे लक्षात येऊ शकेल. आणि गांधींचाही उल्लेख लेखात केला जाईल. --संदेश हिवाळेचर्चा ०९:३१, २५ मार्च २०१८ (IST)Reply

"द ग्रेटेस्ट इंडियन" पानाकडे परत चला.