चर्चा:सदाशिव आठवले
इतिहासाचे तत्त्वज्ञान ह्या पुस्तकाचे सहलेखक
संपादन@ज:सदर माहिती कोणत्या साधनाच्या आधारे नोंदवण्यात आली आहे? माझ्या संग्रहात ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती (१९८६) आहे. त्यात हा उल्लेख आढळला नाही.--सुशान्त देवळेकर (चर्चा) १६:४८, १० डिसेंबर २०१७ (IST)
@सुशान्त देवळेकर: सहलेखक नोंदवण्यात चूक झाली, दुरुस्त केली आहे. इंदूरच्या महाराष्ट्र साहित्य सभेच्या ग्रंथालयातल्या पुस्तकांच्या यादीत इतिहासाचे तत्त्वज्ञान हे नाव दिसले. प्रत्यक्ष यादी उघडता आली नाही, पण तिचा सारांश सापडला. त्यावर सदाशिव आठवले या नावापाठोपाठ म.शं. साठे हे नाव दिसले. आज जेव्हा यादी उघडता आली तेव्हा समजले की हे साठे हे पुस्तकाचे प्रकाशक आहेत. म.शं साठे नावाचे कुणी प्रकाशक आहेत हे माहीत नसल्याने ते सहलेखक आहेत असे गृहीत धरले. चूक दाखवून दिल्याबद्दल आभार.
तुमच्याकडे असलेल्या पुस्तकाचे प्रकाशक कोण आहेत? .... ज (चर्चा) १७:१९, १० डिसेंबर २०१७ (IST)
@ज: माझ्याकडे असलेले पुस्तक प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई ह्यांनी प्रकाशित केले आहे. त्यावर प्रकाशक म्हणून राम कोल्हटकर, प्रकाशक, प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई असे नाव दिलेले आहे.
दुसरा मुद्दा : आपण प्रकाशित साहित्य ह्या भागात शेजवलकरांचे व्यक्तिमत्त्व ह्या शीर्षकाचा लेख असल्याचे म्हटले आहे. त्या पुस्तकात अनुक्रमणिकेत शेजवलकरांचे व्यक्तिमत्व १ असे शीर्षक दिले असले तरी प्रत्यक्षात त्या पृष्ठावर हे शीर्षक दिलेले नाही. आठवल्यांच्या त्या गुरूला नमस्कार असो ह्या मूळ सत्यकथेत आलेल्या लेखावर दि. के. बेडेकरांनी घेतलेला आक्षेप त्यावर आठवले आणि प्रधान ह्यांची प्रतिक्रिया असे त्या परिशिष्टाचे स्वरूप आहे. आपण दिलेली माहिती चुकीची नाही. पण त्या माहितीत त्रुटी आहे. आठवले ह्यांच्या नियतकालिकांतील लेखांची वेगळी यादी करणे बरे होईल. त्यात ह्या लेखांचा उल्लेख करणे उचित ठरेल असे वाटते.--सुशान्त देवळेकर (चर्चा) १७:२८, १० डिसेंबर २०१७ (IST)
@सुशान्त देवळेकर: माहितीत त्रुटी असेल तर ती त्रुटी शक्य असल्यास दुरुस्त करावी किंवा माहिती काढून टाकावी. नियतकालिकांतील लेखांची वेगळी यादी मिळवता आली तर ती मी लेखात जरूर टाकीन, आपणही जमल्यास तसे करावे. ... ज (चर्चा) १७:५१, १० डिसेंबर २०१७ (IST)
बाल-यजमान
संपादनपहा : - [१]