चर्चा:संसार (बौद्ध धर्म)
@संदेश हिवाळे:, या लेखातील {{Buddhist term}} हा साचा विक्शनरीत अधिक उपयोगी आहे. येथून तो घालवावा किंवा याच्याऐवजी विश्वकोशीय माहिती पुरविणारा साचा घालावा. -- अभय नातू (चर्चा) १८:४६, १६ मे २०१८ (IST)
लेखाच्या सुरवातीला सदर संज्ञेबाबत अर्थ देण्यात आलेला आहे म्हणून तो विकिपीडिया शब्दकोषात असावे असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु हे लेख भाषातर करून भविष्यात विस्तारले जाणार आहेत.सदर लेखाला विस्तार साचे यापुढे लावण्यात येतील. म्हणून विक्शनरी मध्ये कसा येईल व मराठी विकिपीडिया इंग्रजी विकिपीडिया वर आहे तसा का साचा ठेऊ नये. याबाबत मार्गदर्शन करावे. प्रसाद साळवे (चर्चा) २१:३६, १६ मे २०१८ (IST)
- लेखातील संज्ञेच्या अर्थाबद्दल नाही तर साच्यातील अनेक भाषांतील समानार्थी शब्द मी लक्ष वेधत आहे. असे समानार्थी शब्द ज्ञानकोशात नाही तर शब्दकोशात पाहिजेत.
- तात्विक संज्ञेबद्दल माहिती देणारा साचा लेखात असण्यास हरकत नाही.
- अभय नातू (चर्चा) २१:३९, १६ मे २०१८ (IST)
- सदर साचा अनेक इंग्रजी लेखात तर आहे. तो इंग्रजी विकिपीडिया वरून येथून तर हिंदी विकिपीडिया वर येथे आहे. या शिवाय अन्य सोळा भाषेत विकिपीडिया वर हा साचा आहे. ज्ञानकोशात जेंव्हा किचकट संकल्पना असतात तेंव्हा इतर भाषेत तो शब्द बघून स्वभाषेत समजणे सोपे जाते. ज्यामुळे संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजते. व शब्द अर्थ स्पष्ट झाल्यामुळे ज्ञानकोश समृद्ध होतो असे वाटते. प्रसाद साळवे (चर्चा) २१:५२, १६ मे २०१८ (IST)
- इंग्लिश किंवा इतर १६ भाषांत असले तर ते आपोआप बरोबर होत नाही.
- इतर भाषांमध्ये तो शब्द पाहण्यासाठीच आंतरविकि दुवे असतात. त्यासाठी साच्याची गरज नाही.
- अभय नातू (चर्चा) २१:५८, १६ मे २०१८ (IST)
- सदर लेख संस्कृत भाषेत नाही. मराठीला जवळची भाषा संस्कृत आहे. संज्ञेचा अर्थ जवळच्या भाषेतूनच कळतो. सदर साचा सर्वच लेखात असावा असे माझे मत नाही परंतु काही किचकट तात्विक संज्ञेबाबत बाबत असावा. शब्द अर्थ स्पष्ट झाल्यामुळे ज्ञानकोश समृद्ध होऊ शकतो असे मी सांगितले आहेच. या साच्यात वा शब्दात मी मनाने काहीही टाकले नाही. इंग्लिश किंवा इतर १६ भाषांत असले तर ते मराठीत असल्यामुळेच चूक होते. हे अनाकलनीय आहे. प्रसाद साळवे (चर्चा) २२:०८, १६ मे २०१८ (IST)
- संस्कृतचा संबंध कोठे आला?
- मी लिहीले - इंग्लिश किंवा इतर १६ भाषांत असले तर ते आपोआप बरोबर होत नाही. -- याचा अर्थ स्पष्ट करतो - इंग्लिशवर किंवा १६ भाषेत लिहिले म्हणजे मराठीत तसेच केले पाहिजे हे बरोबर नाही.
- आंतरविकी दुवे सगळ्या लेखांत असतात. क्लिष्ट आणि सोपे दोन्ही प्रकार. असे असता वेगळा आंतरविकी दुवे असणारा साचा घालू नयेत.
- अभय नातू (चर्चा) २२:५६, १६ मे २०१८ (IST)
- संस्कृतचा संबंध:- साच्यात संसार या शब्दाला संस्कृत मध्ये देखील संसार असेच म्हणतात. म्हणून मराठीत त्यावरून संसारचा अर्थ स्पष्ट होतो. उलट आपण म्हणता इतर भाषांमध्ये तो शब्द पाहण्यासाठीच आंतरविकि दुवे असतात परंतु सदर लेख संस्कृत मध्ये नाही म्हणून आंतरविकि दुव्यातून त्याचा अर्थ काढणे शक्य होत नाही. साच्यात शब्दाचा अर्थ सर्वच भाषेत दिलेला नाही तर केवळ चौदा भाषेत दिला आहे. व मुख्येत्वे चौदा भाषा त्या आहेत ज्या बौद्ध परंपरेशी संलग्न आहेत. आपण चर्चा करत असलेला साचा सोळा भाषेत आहे. म्हणून लेख सोळा भाषेतच आहे असे नाही. इंग्लिशवर किंवा १६ भाषेत लिहिले म्हणजे मराठीत तसेच केले तर मराठी विकिपीडियाचे नुकसान होते व या पूर्वी तसे साचे वापरल्यामुळे नुकसान झाले असल्याबाबत माहित नाही. बौद्ध संज्ञा स्पष्ट होण्याच्या दृष्टीने पाली, संस्कृत, हिंदी, इंग्रजी, नेपाली, भोजपुरी भाषा महत्वाच्या आहेत. पैकी एका दुसऱ्या भाषेत संज्ञा असेल तर अर्थ स्पष्ट होण्यास मदत होते. हे केवळ फक्त काही बौद्ध तत्वज्ञान विषयक संज्ञे बाबतच आहे. सबब हा साचा फक्त काही बौद्ध संज्ञा विषयक लेखात आवश्यक वाटतो. हा साचा असल्यामुळे ज्ञानकोशात भर पडण्याबरोबरच लेख माहितीपूर्ण व आकर्षक होतो. हा साच्या वापरल्यामुळे मराठी विकिपीडिया चे नुकसान होते अथवा मराठी विकिपीडिया नियमावलीला धरून नाही. असे असल्यास कळवावे. इतर जेष्ठ विकिपीडिया सदस्यांचे यावर मत ऐकायला मला आवडेल. प्रसाद साळवे (चर्चा) २३:२१, १६ मे २०१८ (IST)
- एका शब्दाचे लेख अनेक भाषांत असतात. संसार किंवा फक्त काही बौद्ध संज्ञा विषयक यासाठी विशेष नाहीत.
- इंग्लिशवर किंवा १६ भाषेत लिहिले म्हणजे मराठीत तसेच केले तर मराठी विकिपीडियाचे नुकसान होते -- मी लिहिलेले पुन्हा वाचावे. मी न म्हणलेल्या गोष्टी तुम्ही माझ्या लेखणीत/कळपटात घालीत आहात. साध्या शब्दात सांगितले तर - एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारणे बरोबर नव्हे किंवा, १६ लोकांनी विहिरीत उड्या मारल्या म्हणून आपण मारू नये. जे आपल्याला योग्य आहे तेच करावे.
- लेख माहितीपूर्ण आणि आकर्षक करण्यासाठी अनेक उपाय आहेत. माहितीपूर्ण साचे घालणे हा त्यातीलच एक. नुसते या शब्दाला या भाषेत असे म्हणतात हे दाखवून देणाऱ्या साच्याने मराठी विकिपीडियावरील माहितीत भर पडत नाही.
- अभय नातू (चर्चा) २३:३९, १६ मे २०१८ (IST)
- सदर साचा लेखात वापरू नये कारण
- सदर साचा लेखात वापरू नये कारण
१.हा साचा विक्शनरीत अधिक उपयोगी आहे.(विक्शनरीत सदर शब्दच नाही. हा साचा शब्द अर्था साठी नसून संज्ञा स्पष्ट होण्यासाठी आहे)
२.येथून तो घालवावा.
३.तात्विक संज्ञेबद्दल माहिती देणारा साचा लेखात असण्यास हरकत नाही.( हा साचा केवळ तात्विक संज्ञा स्पष्ट करण्यासाठी काही लेखातच आहे)
४.इंग्लिश किंवा इतर १६ भाषांत असले तर ते आपोआप बरोबर होत नाही.
५.इतर भाषांमध्ये तो शब्द पाहण्यासाठीच आंतरविकि दुवे असतात. त्यासाठी साच्याची गरज नाही.
६.इंग्लिशवर किंवा १६ भाषेत लिहिले म्हणजे मराठीत तसेच केले पाहिजे हे बरोबर नाही.(असा साचा मराठीतच का वापरू नये ?? म्हणून मी म्हटले या मुळे मराठी विकिपीडिया चे नुकसान होत असावे. नुकसान होत नसेल तर साचा वापरण्यास अटकाव केला नसता). हा साचा वापरूच नये असा काही ठोस नियम मराठी विकिपीडियावर आहे काय हे लक्षात आणून दिले नाही. जर तसा संकेत असेल ते ते संकेत इतर विकिपीडिया का पाळत नसावेत हे हि सांगितले नाही)
७. हा साचा वापर भयानक असावा कारण एकाने गाय मारली म्हणून आपण वासरू मारणे बरोबर नव्हे किंवा, १६ लोकांनी विहिरीत उड्या मारल्या म्हणून आपण मारू नये. यातून प्रतीत होते.
८.लेख माहितीपूर्ण आणि आकर्षक करण्यासाठी अनेक उपाय आहेत.( याचा अर्थ हा साचा लेख आकर्षक करत नाही किंवा हा साचा वापरून लेख आकर्षक करू नये)
९. माहितीपूर्ण साचे घालणे हा त्यातीलच एक.(हा साचा माहितीपूर्ण नाही.)
१०.या शब्दाला या भाषेत असे म्हणतात हे दाखवून देणाऱ्या साच्याने मराठी विकिपीडियावरील माहितीत भर पडत नाही.(हा साचा केवळ माहितीत भर पडण्यासाठीच नाही तर संज्ञा स्पष्ट होण्यासठी आहे हे वारंवार सांगितले आहे.
- सारांश आपण समजता तसा हा काही गंभीर प्रकार नक्कीच नसावा. साचा वापरामुळे लेखाला आपण समजता तसा फायदा नसेल तर साचा वापरल्यामुले लेखाचे व मराठी विकिपीडियाचे नुकसान होते असेही नाही. म्हणून आपण या साच्याला विरोध करू नये वाटते. तूर्तास चर्चा थांबुयात. शुभ रात्री.
प्रसाद साळवे (चर्चा) ००:१०, १७ मे २०१८ (IST)
- तुम्ही नको त्या गोष्टी उगीचच भडक करीत आहात. गाय आणि विहीर या उदाहरणांचा शब्दशः अर्थ घेतला हे गंमतशीर आहे.
- मुद्देसूद उत्तर लवकरच देतो पण जरा तुमचा हेका सोडा आणि मी नेमके काय म्हणत आहे याचा ज्ञानकोश/विश्वकोशाच्या दृष्टीने विचार करा, फक्त तुमच्याच सीमित फायद्याचा नव्हे.
- अभय नातू (चर्चा) ००:३७, १७ मे २०१८ (IST)