इतरत्र सापडलेला मजकूर संपादन

इतरत्स सापडलेला मजकूर योग्य बदल करुन या लेखात समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) २२:१५, १६ मार्च २०१८ (IST)Reply


संवादिनि हे नाव भारतीय वाद्याचे आहे असे वाटते, पण ते तसे नाही. हार्मोनियम या मूळ पाश्चात्य वाद्याचे ते भारतीय नाव आहे. १७७० इ.स.च्या आसपास आँर्गन या रीङवाल्या वाद्यामध्ये काही नवे प्रयोग होण्यास सुरुवात झाली. मुळात तीन स्वरांचा मेळ जो पाश्चात्य संगीतात आवश्यक असतो, तो साध्य करण्याचे उद्दिष्ट ज्या वाद्याने साध्य होते, तशा वाद्यांची आवश्यकता नव्या रीङ वाद्यांमध्ये निर्माण होऊ लागली. त्या प्रयत्नांतूनच १८४० मध्ये फ्रान्समध्ये अलेक्झांर दिबेन याने अशा स्वरपट्ट्या असणारे हे हलक्या वजनाचे वाद्य शोधून काढले. हार्मनी म्हणजे स्वरांच्या मिश्रणाने साधला जाणारा संवाद. यालाच सहज भाषेत स्वरमिश्रण म्हणण्यास हरकत नाही. अेकमेकास अनुकूल असणा-या स्वरांच्या संवादामुळे भारतीय संगीतकारांनी या वाद्याचे नाव संवादिनि हे योजिले.

विदेशातून आलेले हार्मोनियम हे ऍकच वाद्य नाही. तत्पूर्वी व्हायोलिन भारतात आले होते. त्यातही त्या वाद्याचा प्रथम प्रवेश दक्षिणाधि संगीतात झाला. त्यानंतर ते वाद्य हिंदुस्तानी संगीतात आले.

आँर्गन (हार्मोनियम) पायाने दाब दिल्याने निर्माण होणा-या हवेच्या झोताने वाजे. दोनही हातांचा प्रयोग करुन एकाचवेळी दोन सप्तकांमध्ये वाजू शकणा-या या वाद्याने भारतीय संगीतात नाविन्य आणले. त्यालाच पायपेटी असेही म्हणत. कांही युरोपियन संगीतकारांनी पायपेटी आपल्या प्रार्थनासभेमध्ये प्रथम आणली.

हिंदुस्तानी संगीतामध्ये प्रथम प्रयोग

हिंदुस्तानी संगीतासाठी या वाद्याचा प्रथम प्रयोग मराठी संगीत नाटकांच्या माध्यमातून सुरु झाला तो १८८२ साली. संगीत शाकुंतल या पहिल्या संगीत नाटकाने आँर्गनचा उपयोग केला. त्यानंतर संगीत साैभद्र हे नाटकही त्यातल्या संगीतासाठी आणि आँर्गनच्या सहाय्याने गाजले. मराठी संगीत नाटकानी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींचाही पदांसाठी उपयोग केला आणि त्यातूनच हार्मोनियमने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधले आपले स्थान बळकट केले. नाट्यसंगीताच्या माध्यमातूनच एका स्वतंत्र स्वरवाद्याची देणगी भारतीय संगीताला मिळाली.

भारतात निर्मिति

भारतीय संगीत हे मूलतः बैठकीचे असल्यामुळे खाली बसून वाजिवण्यासाठी या वाद्यामध्ये मूलभूत वदल झाले ते बंगालच्या कारागिरानी बनविलेल्या हातपेटीमुळे. कोलकोत्त्याच्या द्वारिका दास या फर्मने आधुिनक हातपेटीची प्रथम निर्मिति केली. त्यानंतर टी. एस् रामचंद्र अँंड को. यानी महाराष्ट्रात याची निर्मिति सुरु केली. त्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गणपतराव बर्वे यानी त्याची निर्मिति केली. द्वितीय महायुद्धानंतर युरोपमधून आँर्गनची आयातही बंद झाली. मग भावनगर मध्ये आणि पालितानामध्ये पेट्यांसहित ध्वनिपट्ट्यांचीही निर्मिति सुरु झाली.

कर्नाटक संगीतामध्ये संवादिनि

विद्वान टी. चाेडय्या, विद्वान अरुणाचलप्पा,, विद्वान नरसिंहय्या, विद्वान आर. परमशिवन अशा अनेकानी संवादिनीचा प्रभावी उपयोग कर्नाटक संगीतासठी केला.


"संवादिनी" पानाकडे परत चला.