चर्चा:श्रेयस तळपदे
श्रेयस तलपडे असे शीर्षक बदलावे काय ?
संपादनगेले काही महिने, मी या लेखाचा विषय असलेल्या अभिनेत्याच्या तोंडून विविध वाहिन्यांवर बोलताना त्याचे स्वतःचे नाव "श्रेयस तलपडे" असे ऐकत आहे. तसे असेल, आणि त्या अभिनेत्याने "श्रेयस तलपडे" हेच नाव धारण केले असेल, तर या लेखाचे नाव बदलून श्रेयस तलपडे असे लिहावे लागेल. कुणाला काही खात्रीशीर माहिती आहे का ?
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५९, २० मे २०११ (UTC)
- श्रेयस हा त्याचे आडनाव जर 'तलपडे' असे सांगत असेल तर (मी हिंदी वाहिनी संदर्भात बोलत आहे) तर ते फारसे योग्य नाही. हिंदी मध्ये "ळ" हे अक्षरच नाही म्हणून आपण ह्यातून काही मार्ग काढू शकतो का? आपण हिंदी बोलताना किंवा लिहिताना "ळ" असेच वापरले तर काय होईल? भाषा तज्ञांचे या बाबतीत काय मत आहे? 'लोकमान्य तिलक' हे लहानपणा पासून वाचताना मला फार त्रास होतो. जी गोष्ट हिंदी ची तीच इंग्रजीची. तेथे पण "ळ" नाहीच. मग "ळ" आणि "ल" मधला फरक कसा ओळखायचा? काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात मी या विषयावर लेख लिहिला होता. या बाबतीत आपण काही करू शकतो का? आपण "L" च्या मध्ये एक टिंब दिला अमी त्याचा "ळ" म्हणून वापर करायचा ठरवला तर चालणार नाही का? तसेच "श" आणि "ष" हा फरक इतर भाषात कसा दाखवायचा? "ण" साठी पण असे काही करता येईल काय? (माझे आडनाव 'कुलकर्णी' असल्याने मला हा प्रश्न जन्मापासूनच आहे !!!
- मला असे वाटते की, आपली मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या इतक्या अतोनात समृद्ध आहेत की जगातील कोणत्याही भाषेतील कोणतेही शब्द वा उच्चार आपल्याला या दोन भाषांमध्ये करता येतात (हे 'सामान्यतः' मी म्हणत आहे). पण इतर भाषांमध्ये जर अशी काही अक्षरे नसतील तर ते आणण्यासाठी आपण प्रयंत्न करू शकतो का? मला या विषयावर "चांगली चर्चा" करायला आवडेल.....
- --मंदार कुलकर्णी
हिंदी आणि मराठी
संपादनहिंदी बोलताना आणि हिंदी चित्रपटांत काम करताना तो तलपडे असतो, मराठीत तळपदे. मराठीतली भक्ती बर्वे हिंदी-गुजराथीत भक्ति बर्वे असायची. कनिमोळी ही हिंदी-मराठीत कन्निमोझी किंवा कनिमोड़ी आहे. इंग्रजीत श्रेयस तळपदे हा श्रेयअॅज़् टॅल्पेऽड् होणारच. ...J १८:१०, २० मे २०११ (UTC)
कळ्हिमोनिचा कझिमोनी हा फक्त इंग्रजीवरच विसंबलेल्या मराठी माध्यमांतल्या मंडळींनी केला आहे, तो त्या स्पेलिंगमधल्या झेडचा झ असा उच्चार करून. वास्तविक त्यांच्या पूर्वसूरींनी कळ्हघम या पक्षाच्या नावाच्या शब्दातल्या स्पेलिंगमध्ये झेड असतानाही त्याचा योग्य मराठी उच्चार लिहीलेला आहे. - Manoj ०६:०५, २१ मे २०११ (UTC)
मराठी उच्चार योग्य?
संपादनमराठी उच्चार योग्य आहे असे म्हणणे धार्ष्ट्याचे आहे. तमिऴमधल्या ऴ चा उच्चार मराठीत लिहिणे कठीण आहे. इंग्रजीत तर अशक्य आहे. केवळ त्याला पर्याय म्हणून इंग्रजीने zh असे लिहिले, तर काही चुकीचे नाही. जे अक्षर त्यांच्या लिपीत नाही त्यासाठी त्यांना काहीतरी लिहिणे भाग आहे. ऴ साठी λ लिहिले असते तरी कुणीतरी विरोध केलाच असता. मराठीभाषकांनी zh चा उच्चार झ केला हा त्यांचा दोष, हे आपले म्हणणे पटले.
तमिऴमध्ये दोन ण आहेत, आपण वेगळे लिहू शकू? त्यामुळे इतर भाषेतले शब्द मराठी लिपीत आणताना त्यांचे मराठीकरण करावे आणि या उलट, हाच एकमेव मार्ग.
एकूण काय? तर, मराठी विकिपीडियावर श्रेयस तळपदे, हिंदीवर तलपदे आणि इंग्रजीवर टॅल्पेऽड असे लिहिल्याशिवाय गत्यंतर नाही..J १०:४७, २१ मे २०११ (UTC)
- पण हिंदीत मुळातला प्रॉब्लेम "ळ" नसण्याचा आहे, त्यांच्याकडे "द" तर आहे ना ? मग प्रस्तुत अभिनेत्याला हिंदी भाषेच्या उच्चारमर्यादांमध्ये अडकूनही स्वतःचे आडनाव "तलपदे" असे सांगावेसे वाटायला हवे. पण "तलपदे" असे न सांगता प्रस्तुत अभिनेता जर "तलपडे" असे आडनाव सांगत हिंडत असेल, तर त्याचे अधिकृत नाव बदलले गेले आहे किंवा कसे, याबद्दल शंका वाटायला लागते. म्हणूनच या चर्चेच्या सुरुवातीला मी याबद्दल काही विश्वसनीय माहिती आहे काय, असे विचारले.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२६, २१ मे २०११ (UTC)