चर्चा:श्रुती बंदोपाध्याय
Latest comment: १ वर्षापूर्वी by अभय नातू in topic चुका
चुका
संपादन- @अभय नातू:, नमस्कार याच्या मध्ये तुम्ही "बदल" हा Tag लावलेला आहे याच्यामध्ये काय चुका आहेत त्या निदर्शनास आणून द्यावे..
AShiv1212 (चर्चा) ०९:५५, २८ मे २०२३ (IST)
- @AShiv1212:,
- नमस्कार,
- लेखात व्याकरणाच्या अनेक चुका दिसतात तसेच प्रथमदर्शनीच हा लेख मशीन ट्रान्सलेटेड दिसून येतो. उदा --
- ह्या विश्वभारती शांतिनिकेतनमध्ये मणिपुरी नृत्याच्या प्राध्यापिका आहेत. ती फुलब्राइट फेलोशिप, यूएस आणि यूकेमध्ये अनुक्रमे शिकवण्यासाठी आणि कामगिरीसाठी कॉमनवेल्थ फेलोशिपची प्राप्तकर्ता आहे.
- ह्या (या पाहिजे), आहेत या नंतर ती, आहे असे एकेरी उल्लेख दिसतात.
- ...करण्यासाठी समर्पित मणिपुरी नृत्यातील ती एक प्रमुख प्रवर्तक आहे'
- या वाक्याचा अर्थ काय?
- याशिवाय क्लिष्ट भाषे ऐवजी सोप्या शब्दात माहिती सादर करावी म्हणजे वाचकाला कळण्यास सोपे होईल.
- तुमच्या योगदानाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १०:००, २८ मे २०२३ (IST)