चर्चा:शफाली वर्मा

Latest comment: ७ महिन्यांपूर्वी by अभय नातू in topic संदर्भ

इतरत्र सापडलेला मजकूर संपादन

हा मजकूर योग्य बदलांनिशी लेखात हलवावा -- अभय नातू (चर्चा) १९:३८, २६ सप्टेंबर २०२३ (IST)Reply


शेफाली वर्माही एक भारतीय क्रिकेटपटू आहे. यांचा जन्म 28 जानेवारी 2004ला रोहतक येथे झाला असून , जी भारताच्या महिला संघाकडून खेळते. कुठल्याही आंतरराष्ट्रीय T-20 सामन्यात भारताकडून खेळणारी ती सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. हे तिचे एक वैशिष्ट्य आहे. शेफालीने वयाच्या 15व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक झळकावले.महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा ३० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. सचिन यांनी त्याचे पहिले अर्धशतक एका कसोटी सामन्यात केले होते, तेव्हा त्याचे वय सोळा वर्षे होते.[1][2]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी संपादन

नोव्हेंबर 2013मध्ये शेफाली नऊ वर्षांची असताना तिचे वडील तिला दिल्लीजवळच्या रोहतकमधील स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचा शेवटचा रणजी चषक सामना बघण्यास घेऊन गेले होते. हाच शेफालीच्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस ठरला. ती सांगते की सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या मुंबई संघाला विजयाकडे नेताना पाहून मी निश्चय केला की सर्व आव्हानांना तोंड देत आपण क्रिकेट खेळायचे.

शेफालीने अनेक मुलाखतींमध्ये सचिन तेंडुलकर यांनी आपल्याला प्रेरित केल्याचे सांगितले आहे. परंतु आणखी एका व्यक्तीने तिच्या या महत्त्वाकांक्षेला पंख देण्याचे काम केले आहेत, ते म्हणजे तिचे क्रिकेटवेडे वडील. तिच्या वडिलांना क्रिकेटची आवड असल्यामुळे त्यांनी देखील शेफालीला प्रोत्साहन दिले.

शेफालीचा भाऊ स्थानिक क्रिकेट क्लब्समध्ये खेळत असत, परंतु शेफाली एक मुलगी असल्याने तिला त्या क्लबने कधीच संघात स्थान दिले नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी तिच्या वडिलांनी एक तोडगा काढला – त्यांनी शेफालीचे केस एखाद्या मुलाप्रमाणे कापून घेतलेत, आणि ती मुलगा असल्याचे भासवत तिला संघात खेळण्याची संधी मिळवून दिली. या संधीचे मात्र तिने सोने केले.

जेव्हा शेफालीचा भाऊ आजारी पडला, तेव्हा शेफालीने त्या स्थानिक संघात त्याची जागा घेतली. एवढंच नव्हे तर त्या स्थानिक स्पर्धेत तिने सर्वोत्तम खेळाडूसाठीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ आणि ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्कार पटकाविले.[2][3]

व्यावसायिक कारकीर्द संपादन

सप्टेंबर 2019मध्ये वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी शेफालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंबर 2019मध्ये वेस्ट इंडीज संघाविरुद्ध खेळताना ती सर्वात कमी वयाची भारतीय अर्धशतकवीर झाली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या याच दौऱ्यात तिने पाच सामन्यांमध्ये 158 धावा करत प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कारही पटकावला. [4]

जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड करण्यात आली. आणि यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने तिच्याबरोबर करारही केला. [3]

आणि शेफालीने ही स्पर्धासुद्धा गाजवली. 161च्या स्ट्राइक रेटसह शेफाली या स्पर्धेत तिसरी सर्वाधिक धावा काढणारी खेळाडू ठरली. या कामगिरीसाठी भारताच्या माजी धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवाग यांनी शेफालीला ‘रॉकस्टार’ म्हणून संबोधले होते. सद्यस्थितीत आयसीसीच्या टी-20 महिला खेळाडूंच्या यादीत शेफाली जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. [5]


संदर्भ संपादन

Women's T20 World Cup: Shafali Verma, India's 16-year-old 'rock star' [1] Shafali Verma-Profile[2] Women who inspire us: Shafali Verma [3] Shafali Verma: The strong girl who's batting down barriers[4] http://www.iccworldtwenty20.com/ (5)



अभय नातू (चर्चा) १९:३८, २६ सप्टेंबर २०२३ (IST)Reply

"शफाली वर्मा" पानाकडे परत चला.