चर्चा:विल्हेम राँटजेन

Latest comment: १० वर्षांपूर्वी by अभय नातू

विल्यम रॉंटजेन पानावरील मजकूर येथे आणला. यातील निवडक मजकूर लेखात हलवावा.

अभय नातू (चर्चा) १२:०४, २२ जानेवारी २०१४ (IST)Reply


विल्यम कोन्राड रॉण्टजेन यांचा जन्म जर्मनीतील लेनेप या गावी १८४५ मध्ये झाला. विल्यमचे वडील कापडाचे व्यापारी होते व विल्यम हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. शाळेतील अभ्यासात, विल्यम एक शांत स्वभावाचा, पण सामान्य बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी गणला जायचा. शाळेतील मास्तरांचे विनोदी व्यंग्यचित्र काढण्याचा खोटा आळ त्याच्यावर येऊन, विल्यमची शाळेतून हाकलपट्टी करण्यात आली. शाळेतून उचलबांगडी झाल्याचा कलंक लागल्यामुळे त्याला युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळू शकला नाही.

विल्यमला यांत्रिक वस्तू तयार करण्याचे वेड होते. त्यामुळे त्याच्या वडीलांनी त्याला नाइलाजाने झुरिच येथील पॉलिटेक्निकमध्ये घातले. १८६९ साली त्याला डिप्लोमा मिळाला. सुदैवाने फिजिक्सचे प्रोफेसर डॉ. कुण्ड यांनी विल्यमचे गुण हेरले व त्याला मेकॅनिकल इंजिनीअरिंग सोडून फिजिक्स या विषयात रुची निर्माण करीत असिस्टंट म्हणून त्यांच्याबरोबर काम करायला घेतलं. याच विद्याथ्र्याला पुढे नोबेल पारितोषिक मिळेल, याची सुतराम कल्पना देखील प्रोफेसर कुण्ड यांना नव्हती.१८७९ मध्ये रॉण्टजेन यांना जीसेन युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसरशिप मिळाली. येथे त्यांनी गॅसेस व किस्टल्स यांच्या थर्मल कंडक्शनवर प्रयोग केले. एक हुशार प्रायोगिक अभ्यासक म्हणून त्यांची कीर्ती पसरली व ज्या युनिव्हर्सिटीत १६ वर्षां पूर्वी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला त्याच वुर्झबर्ग युनिव्हर्सिटीत त्यांना १८८८ मध्ये अत्यंत सन्मानाने प्रोफेसर व डायरेक्टर हे पद बहाल करण्यात आले.

याच युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेत ते कु्रक्स हाय व्हॅक््यूम ट्यूब्सबर काम करीत होते. मध्यंतरी १८७२ साली बर्थालुडविग या युवतीशी त्यांचे लग्न झाले. ती उत्कृष्ट स्वयंपाक करायची, पण रॉण्टजेन यांना प्रयोगशाळेतील व्यस्तते मुळे जेवण्या-खाण्याची शुद्ध नसायची. इलेक्ट्रिकल करंटमुळे अदृश्य किरणे निघतात, याची खातरजमा झाल्यावर या किरणांचे गुणधर्म तपासायला सुरुवात केली. या क्ष-किरणांना तीव्र भेदक-शक्ती असल्याचं त्यांना दिसून आलं. दीड इंच जाड शिसेचयांना पूर्णपणे थोपवू शकते तसेच क्ष-किरणांना फोटोग्राफिक गुणधर्म आहेत, हेत्यांनी दाखवले. त्यांची पत्नी बर्था हिच्या हाताचा एक्स-रे एका फोटोग्राफिक प्लेटवर २२ डिसेंबर १८९५ रोजी काढला व हा जगातील पहिला मानवी अवयवाचा एक्स-रे ठरला.

या शोधामुळे मेडिकल जगतात क्रांती झाली. आतापर्यंत शरीरातील अंतर्गत अवयव फक्त पोस्टमार्टेम मध्येच दिसायचे. पण, या संशोधनामुळे हाडां पर्यंत अवयव स्पष्ट दिसू लगल्यामुळे रोगनिदान शास्त्राने भरारीच मारली.

एका सैनिकाच्या पायात घुसलेली गोळी एक्स-रेच्या साहाय्याने काढण्यात आली. तसेच शरीरातील मोडलेल्या हाडांची नीट कल्पना आल्यामुळे हाडे-जुळणीसाठी एक्स-रेचा उपयोग सर्रास व्हायला लागला. क्ष-किरणांचा वापर करून निरनिराळे अवयव कसे अभ्यासता येतील, याचे प्रयोग व्हायला लागले वविल्यम कोन्राड रॉण्टजेन हे नाव सर्वतोमुखी झाले. निरनिराळ्या सन्मानांचा वर्षाव त्यांच्यावर व्हायला लागला. बर्लिनयेथे ‘प्रशियन ऑर्डर ऑफ क्राऊन' हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना मिळाला वत्याच समारंभात तेथील प्रोफेसर ऑफअ‍ॅनाटॉमी- प्रोफेसर अल्बर्ट कोहलीकरयांनी या क्ष-किरणांना यापुढे रॉण्टजेन यांचासन्मान म्हणून ‘रॉण्टजेन रेज' नामाभिधान दिले व ते आजही वापरण्यात येते. याच संशोधनासाठी रॉण्टजेन यांना १९०१ साली फिजिक्स या विषयातील पहिले नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले! अतिशय निगर्वी व पैशाचा हव्यास नसल्यामुळे, नोबेल पारितोषिकाचा सर्व पैसा त्यांनी वुर्झबर्ग युनिव्हर्सिटीला दान केला.

या पाठोपाठ अनेक मानसन्मान वबक्षिसे रॉण्टजेन यांना मिळाली व ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले. बर्लिनमध्ये त्यांचा पुतळादेखील उभारला गेला तसेच ‘रॉयल ऑर्डर ऑफ मेरिट' हा सन्मान देखील त्यांच्या वाट्याला आला. म्युनिच येथील प्रसिद्ध मॅकमिलन युनिव्हर्सिटीत प्रोफेसर ऑफ फिजिक्स म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या त्यांच्या प्रसिद्धीमुळे व महानतेच्या वलया मुळेत्यांची पत्नी बर्था मात्र त्रस्त होती. तिच्यामते या प्रसिद्धीमुळे त्यांच्या घरातील शांतता ढळली गेली व निवांतपणा दुरापास्त झाला.

रॉण्टजेन स्वत: अत्यंत भिडस्त, लाजाळू व स्टेज फ्राईट- व्यासपीठाची धास्ती असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांचे वस्तृत्व देखील यथातथाच होते. नि:स्पृहतेचं प्रतीक असल्यामुळे त्यांनी क्ष-किरण शोधाचे पेटंटदेखील घेतले नाही.

"विल्हेम राँटजेन" पानाकडे परत चला.