Untitled

संपादन

विदा हा शब्द 'Data' या शब्दाला समानार्थी म्हणून मराठी वा हिंदीत कोठेही वापरण्यात येतांना दिसत नाही. हा शब्द, या लेखाच्या लेखकाने निर्मिलेला आहे का ? असल्यास त्यास सर्वानुमतीची गरज आहे. लेख न वाचलेल्यांना हा शब्द 'Data' या शब्दाला समानार्थी आहे, हे स्वप्नातही वाटणार नाही. असे शब्द शक्यतो, सर्वांना सहज अर्थ कळतील असे व स्वयं-अर्थी असावे ( intuitive व Self-explainatory) असे वाटते. याच शब्दावरुन बनवलेला विदागार हा शब्द ही असाच आहे. Archives ला मराठीत "पुरालेखागार" हा शब्द असतांना नवीन अनाकलनीय शब्दांचा शोध लावण्याचा खटाटोप कशासाठी ?

Girish2k ०४:४९, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)

विदा उत्खनन या लेखाच्या चर्चा पानावरही अशाच प्रकारची चर्चा आल्याचे आढळले या चर्चेस अनुलक्षून माझी व्यक्तीगत मते :
माझे उपरोक्त विषयावर मत वेगळे असले तरी (जे खाली विस्तार पुर्वक नोंदवणार आहे), विकिपीडिया:शुद्धलेखन प्रकल्पांतर्गत "क्लिष्टता आक्षेप" नोंदवण्याकरता {{क्लिष्टभाषा}}[सोप्या शब्दात लिहा] हा साचा उपलब्ध केला गेलेला आहे ह्या कडे लक्ष वेधू इच्छितो.
व्यापक परिघात पाहील्यास या वाद विषयाचा एकुणच संबंध भाषाशास्त्राशी येतो, ज्या बद्दल मराठी भाषेत काम कमी झाले आहे आणि आंतरजालावर तर अजूनच कमी माहिती उपलब्ध आहे.तरी सुद्धा काही किमान सोप्या उपलब्ध गोष्टींकडे पाहता येईल. मराटी विकिबुक्सवर चेतना प्रधान' (विभागीय साहाय्यक संचालक),भाषा संचालनालय यांचा एक लघुनिबंध शब्दकसे घडतात घडवले जातात या संबंधी उद्बोधक माहिती थोडक्यात देतो.भाषा सल्लागार मंडळाने वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेच्या निर्मितीसाठी आधारभूत म्हणून ठरवून दिलेली निदेशक तत्त्वे मराठी विकिपीडियावर परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे या लेखात उपलब्ध आहेत.
मराठी विकिपीडियाच्या संदर्भाने तुम्ही चपखल मराठी शब्द कसे शोधता? हि चर्चा विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प येथे उपलब्ध केली आहे.
पहिली गोष्टही कि विदा हा शब्द मराठी विकिपीडियावर घडवला गेलेला शब्द नाही.१) "विदा" या शब्द निर्मितीचे श्रेय श्री. शैलेश खांडेकर यांना जाते,असे मनोगत संकेतस्थळावर नमुद केलेले आढळून आले. २) डाटा करिता "विदा" शब्दभांडार या भांडारकरांच्या परभाषी शब्द मिलिन्द भांडारकरांच्या शब्दभांडार या परभाषी शब्द निर्मितीकरताच्या ऑनलाईन शब्दसंग्रहात स्विकारला गेला.मिलिन्द भांडारकरहे संस्कृत भाषेचे डोळे झाकुन समर्थन करणाऱ्यांपैकी नव्हेत.मिलिन्द भांडारकरांचा शब्द सुगमता आणि क्लिष्टता संबंधी शब्दांना सांख्यकीय मुल्य weightage देण्याबद्दलही अभ्यास आहे हेही लक्षात घ्यावयास हवे.
इंग्रजी भाषेतील Data हा शब्द लॅटीन Datum वरून येतो. etymonline term=data जो प्रोटो इंडो आर्यन मूळ शब्दाची देणे या अर्थाने असलेली लॅटीन रूप datus आणि संस्कृतरूप ददाती ही रूपांशी संबंधीत आहे. etymonline term=date
१) विद् म्हणजे जाणणे म्हणून विद् या संस्कृत शब्दा वरून हा शब्द आला आहे. जसे विद् पासून विद्या. हे लेखात सदस्य कट्यारे यांनी नमुद केलेच आहे.
२) wikt:इंग्रजी-मराठी_पारिभाषिक_संज्ञा येथे Datum करता विदित Database करता विदितागार ( आणि माहिती-तळ) हे शब्द सुचवले गेले आहेत.
विद् शी संबंधीत विवीध शब्द पहा
  • विद्या, वेद, निविदा
    • विद् वि० [सं०√विद् (जानना)+क्विप्] जाननेवाला। ज्ञाता। जैसे—ज्योतिर्विद। पुं० १. पंडित। विद्वान। [१]
    • विदित भू० कृ० [सं० विद् (जानना)+क्त] जाना हुआ। अवगत पुं० कवि।
    • विदत्त भू० कृ० [सं० तृ० त०] १. दिया या सौंपा हुआ। बाँटा हुआ।
    • विदमान वि०=विद्यमान्।
    • विदिथ पुं० [सं० विद्+थन्, इ] १. पंडित। विद्वान। २. योगी।
    • विदु वि० बुद्धिमान्।
    • विदुत्तम पुं० [सं० ष० त०] १. वह जो सब बातें जानता हो।
    • विदुर पुं० [सं०√विद् (जानना)+कुरच्] १. वह जो जानकार हो। २. ज्ञानवान्। ज्ञानी। ३. पंडित।
    • विदुष/विदुषी पुं० [सं०√विद् (जानना)+क्वसु, व-उ] [स्त्री० विदुषी] विद्वान। पंडित।
    • विदेय वि० [सं० तृ० त०] दिये जाने के योग्य। देय।
    • विद्यमान वि० [सं०] [भाव० विद्यमानता] १. जो अस्तित्व में हो। २. जो सामने उपस्थित या मौजूद हो। विशेष—‘उपस्थित’ और ‘विद्यमान’ में मुख्य अन्तर यह है कि ‘उपस्थित’ में तो किसी के सामने आने या होने का भाव प्रधान है, परन्तु ‘विद्यमान’ में कहीं या किसी जगह वर्तमान रहने या सत्तात्मक होने का भाव मुख्य है।
    • विद्याधारी पुं० [सं० विद्याधर+इनि, विद्याधारिन्]
    • विधा स्त्री० [सं०] १. ढंग। तरीका। रीति।
    • विधि स्त्री० [सं०] १. कोई काम करने का ठीक ढंग या रीति, क्रिया व्यवस्था आदि की प्रणाली।
  • उपरोक्त शब्द पाहिले असता विदा शब्दाच्या सुगमते बद्दल अथवा क्लिष्टते बद्दल चर्चा होऊ शकते पण तो अगदीच अस्थानी अथवा आकाशातून पडला आहे असे भासत नाही.आपल्या भाषेत आधी पासून असलेल्या शब्दार्थांशी मिळता जुळता आहे. पारिभाषिक शब्द अल्पाक्षरयुक्त असावेत जोडाक्षरे कमीतकमी असावीत हे गुण या शब्दास लागू होतात. शासकीय शब्दकोशांनी सुचवलेले इतर शब्द पाहिले असता त्यांना इतर अर्थ आहेत.पण विदा शब्दास मराठी नाम म्हणून एकच अर्थ निघण्याची शक्यता आहे.विदाई शब्दाशी संबंधीत विदा करना हे क्रियापद हिंदीत येते पण मराठीत फारसे वापरले जात नाही.पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत शक्यतो एक शब्द – एक अर्थ असेच व्हावयास हवे हि अपेक्षा 'विदा' हा शब्द बऱ्या पैकी पूर्ण करतो.
  • विदा हा शब्द केवळ मराठी विकिपीडियात वापरला गेला आहे हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही. विदा शब्द मराठी संकेतस्थळावरील विवीध लेखातून चांगल्या प्रमाणात वापरला जातो आहे असे दिसते.


प्रेषक नरेंद्र गोळे , मनोगत संकेतस्थळ (मंगळ., ०२/०६/२००९ - ११:४०)

    • संगणक विश्वात .... सध्या ढगाळ वातावरण आले आहे व मीमचा विदा (डाटा) हा ढगात आहे त्याची काळजी घेतो जरा..... [mimarathi.net/node/8627‎ 'क्लाउड कंप्युटिंग' - म्हणजे काय रे भाऊ ? -Mimarathi संकेतस्थळ]
    • यातून खरचं काही वीज बचत होते असा कुठला ही विदा (डाटा) माझ्याजवळ नाही आहे. पण यामुळे एक जनजागृती निर्माण होत आहे, [www.mimarathi.net/node/8459 अर्थ अवर २०१२ | Mimarathi]
    • वर सांख्यिकीचा विषय निघालाच आहे, त्यातच असाही डाटा/डेटा/विदा जमवला पाहिजे किंवा संशोधन केले पाहिजे की ...,सर्वज्ञात माहीत नाही. काही विदा आहे का? ,मीही वर विदाची विचारणा केली आहे., अर्थातच याचा काही विदा माझ्याकडे नाही. केवळ गट्-फीलिंग आहे.,

[mr.upakram.org/node/2071 मूर्तीपूजन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे कां ... हैयो हैयैयो उपक्रम संकेतस्थळ October 7, 2009 - 2:07 am चर्चेतील विवीध प्रतिसाद]

    • प्रत्यक्ष विदा नसल्यामुळे वितरण कसं असेल याविषयीचा अंदाज चित्रमय पद्धतीने मांडला आहे [www.aisiakshare.com/node/497‎ भारताची प्रगती २: घृतं पीबेत लेखक/लेखिका: राजेश घासकडवी (| ऐसीअक्षरे Jan 30, 2012 ]
    • सामान्य ज्ञान, तर्कसंगत विचार, उत्तम निरीक्षण, प्रयोग करुन पहाण्याची आवड, विदा (डाटा) वरुन निष्कर्ष, दोष हुडकून काढण्याची हातोटी अशा काही मूलभूत बाबींवर आधारलेला हा अभ्यासक्रम आहे. [misalpav.com/node/6788 नाहीच जमत बुवा काही गोष्टी! | मिसळपाव संकेतस्थळ]
    • Welcome to Vida Data Systems. We deliver productivity and data management systems to help streamline your business workflows and information needs. [vidadatasystems.com/‎]
विदा शब्दाच्या उपयोग इतरत्रही चालू असल्याची उपरोक्त काही उदाहरणे. याचा अर्थ डाटा शब्दा करता विदा शब्द वापरावा का आणि अजून काय शब्द असावेत या बद्दल चर्चा होऊ नये असे नाही.उलट पक्षी अशी चर्चा झाली पाहीजे.पण त्याच वेळी रचना प्रधान म्हणतात त्या प्रमाणे "मराठी परिभाषेवर होणारा संस्कृतप्रचुर, क्लिष्ट व बोजडतेचा आरोप तितकासा खरा नाही. बहुदा नवीन प्रतिशब्द प्रथम अपरिचित वाटल्याने अपरिचयात् अवज्ञा होते. " असे तर होत नाहीना या बद्दलही विचार झाला पाहीजे.
शासकीय आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात वापरल्या गेलेल्या परिभाषेतही मोठ्या प्रमाणावर अनाकलनीयता आणि क्लिष्टता बोजडपणा आहे त्यामुळे मराठी विकिपीडियाने केवळ संदर्भ असलेल्या वापरल्या गेलेल्या शब्दांवरच अवलंबून रहावे हे तितकेसे उचीत ठरणार नाही.याचे अजून दोन महत्वाची कारणे इंग्रजी विकिपीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुक्तस्वरूपातील माहिती अनुवादाकरता उपलब्ध होते. अगणित शब्दांना शब्दगत संकल्पनांना अद्यापही पर्यायी मराठी पारीभाषिक शब्द कोणत्याही कोशात उपलब्ध नाहीत अशा संकल्पना मराठी लोकांना समजण्यास सोप्या जाव्यात म्हणून स्वत:च्या कुवतीनुसार मराठी लेखकांनी वेळोवेळी शब्दांचे प्रयोजन करून पहाणे योग्य ठरते.त्या शिवाय लेखन करणाऱ्या व्यक्तिस त्याच्या नैसर्गिक लेखन शैली ओघात कोणते शब्द उपयोजीत करावेत याचे पुरेसे स्वातंत्र्य असावे कि नैसर्गीक पणे लिहिताना प्रत्येकवेळीस शब्दांचा विचारकरत राहील्यास कृत्रीमता येते ती टाळणे महत्वाचे हे ही लक्षात घ्यावयास हवे.
"शब्दांचा शोध लावण्याचा खटाटोप कशासाठी ?" किंवा संदर्भ असेल तरच मराठी शब्द वापरा अन्यथा इंग्रजी शब्द वापरा या दोन्ही भूमीका जशा टोकाच्या ठरतात त्या प्रमाणे पूर्ण संस्क्र्तोद्भव शब्दांवर अवलंबून भाषाशुद्धीकरणाचा आग्रह हे दुसरे टोक आहे.
सर्वांना सहज अर्थ कळतील असे व स्वयं-अर्थी असावे ( intuitive व Self-explainatory) शब्दांचा शोध चालू ठेवण्याचा आग्रह मात्र स्विकार्ह आहे.
    1. न्यास ह्या शब्दाचा एक अर्थ खूण असा होतो (संदर्भ - शब्दानंद, संपादिका - स्त्त्वशीला सामंत), त्यावरून डेटासाठी हा शब्द वापरला असावा असे वाटते. मराठी भाषा. कॉम ह्या संकेतस्थळावरही भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या शब्दकोशामध्ये डेटा ह्या शब्दासाठी न्यास हा शब्द दिल्याचे पाहिले. तसेच ह्या संकेतस्थळावर डेटा ह्या शब्दासाठी संदर्भानुसार वापरण्यासाठी पुढील प्रतिशब्दही दिलेले आहेत - आधार सामग्री, न्यास, दत्त, प्रदत्त, आकडे, माहिती. -मनोगत संकेतस्थळावर प्रेषक वरदा (रवि., ०८/०३/२००९ - ०१:४०) यांनी दिलेल्या माहितीवरून
संदर्भाचे टॅग जोडताना काही तांत्रीक समस्या त्रस्त करत होत्या त्यामुळे संदर्भ विकिपीडिया शैलीत जोडता आले नाही या बद्दल क्षमस्व.पुढील चर्चेस शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४९, १८ ऑगस्ट २०१३ (IST)Reply

संदर्भ

संपादन


Is it data or database?

संपादन

I can see that from the article sanganak vidnyan, this article is referenced for the word database. But it seems that this word is used for data. So does this article mean data or database? Thank you. -- डॉ. अभिजीत सफई ०७:४३, १ जानेवारी २०१९ (IST)Reply

चर्चा: विदा

संपादन

विदा हा शब्द data साठी कुणी वा का आणला यापेक्षा महत्वाचं म्हणजे डेटा याला संस्कृतमध्ये पाचएक हजारवर्षापासुन शब्द उपलब्ध आहे हे कदाचीत विदा शब्द वापरनार्यांना माहीत नसावे. असो, कपिलमुनींनी उपनिशदात महादेवाच्या सांगन्यावरुन एकुण सहा दर्शनशास्त्रांंपैकी दोन दर्शनशास्त्रे लिहीली त्यातील एक न्यायदर्शन व दुसरे सांख्यदर्शन. या सांख्यदर्शन पासुनच गितेत एकाा अध्यायाचं शिर्षक सांख्ययोग असं केलं आहे व ज्ञानेश्वारानी ज्ञानेश्वरीत ते तसंच वापरलं. तसेच, आजकाल सांख्यशास्त्र वा सांख्यिकी हे शब्द statistics साठी याच संदर्भाने वापरले जातात. संस्कृतात सांख्यचा अर्थ व संख्याचा अर्थ वेगवेगळा दिला आहे. संख्या म्हणजे फक्त अंक पण सांख्य हे संख्यांच्या समुहात गुढार्थ लपलेले असल्यास त्याला सांख्य म्हणावं अशी व्याख्या आहे. गुढार्थला पॅटर्न किंवा लपलेली माहीती असं ढोबळ मानानं म्हणता येउ शकतं. मग प्रश्न हाच की data ला सांख्या हा शब्द मराठी व संस्कृतात वापरला असतांना नविन अगम्य शब्दांची कसरत कशाला? Devendratandle (चर्चा) १४:२४, २ जानेवारी २०१९ (IST)Reply

"विदा" पानाकडे परत चला.