चर्चा:वनस्पतीशास्त्रीय नावांचा उगम आणि अर्थ

निबंधात्मक/ शोधनिबंधात्मक स्वरूप

संपादन

या लेखाचे सध्याचे स्वरूप निबंधासारखे / शोधनिबंधासारखे वाटत आहे. माहितीची मांडणी/पुनर्‍चना करून, संदर्भ जोडून लेखाला विश्वकोशीय स्वरूप देणे आवश्यक वाटत आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०७, २२ जुलै २०११ (UTC)


ते कसे करणार? मुळात अशाच प्रकारचा जो आधीचा लेख आहे त्याचे स्वरूपही जवळजवळ असेच आहे. पुरेशी नावे जमली की त्यांचे वर्गीकरण करता येईल, आणि ही नावे कोणकोणत्या वनस्पतींच्या नावांत आहेत तेही नमूद करता येईल. ही नावे एकाच पुस्तकात मिळत नाहीत, त्यामुळे नावे जमवायला वेळ लागणारच. वनस्पतींची एकूण नावे अगणित असणार, त्यांतली जी नावे औषधी वनस्पतींच्या संदर्भात आहेत, तेवढीच जमवणे गरजेचे आहे. संदर्भही अनेक असणार, ते जोडणे मोठे जिकिरीचेच काम आहे

यापेक्षा जास्त काही करणे शक्य असेल ते सांगावे, प्रयत्न करून पाहता येईल.....J १८:१९, २२ जुलै २०११ (UTC)

मला वाटते या लेखात --

  • वनस्पतीशास्त्रांतर्गत वापरल्या जाणार्‍या नावांचे classification[मराठी शब्द सुचवा] कसे ठरवतात (उदा. वंश, उपवंश, जाती, प्रजाती, इ. असतात तसे) कसे केले जाते याबद्दलचे विवरण असावे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे नावे ठेवण्याच्या पद्धतींची नावे आणि थोडक्यात विवरण असावे. नावे ठेवण्याच्या पद्धतींप्रमाणेच दात विचकून हसण्याच्या पद्धतींचेही विवरण असावे.....हाहाहा! हलकेच घ्या हे शेवटचे.
  • प्रत्येक मुख्य प्रकारांत (तृणे, धान्ये, झाडे, झुडुपे) मोडणार्‍या काही वनस्पतींची नावे व ती कशी derive[मराठी शब्द सुचवा] होतात याची पदावली असावी.
  • संदर्भग्रंथ, संकेतस्थळे असावीत.

अभय नातू २०:१९, २२ जुलै २०११ (UTC)

ता.क. मी या शास्त्रातील पंडित नाही त्यामुळे मी काही सूचना असे न लिहिता काही सुझाव (विनम्रपणे केलेली सुचवणी) हा हिंदीतील शब्द उचलला आहे.

"वनस्पतीशास्त्रीय नावांचा उगम आणि अर्थ" पानाकडे परत चला.