बिरबल बरोबर की बीरबल (वीरबळचा अपभ्रंश)?

अभय नातू १५:५९, २९ मार्च २०११ (UTC)

हिंदीत बीरबल, मराठीत बिरबल. मराठीत उपान्त्यपूर्व इकार-उकार र्‍हस्व असतात.--J १७:३९, २९ मार्च २०११ (UTC)

विशेषनामालाही शुद्धलेखनाचे नियम लावावे?
अभय नातू १७:४५, २९ मार्च २०११ (UTC)
दुर्दैवाने लावावे लागतात. संस्कृतमधील नीलकंठ मराठीत निळकंठ होतो; विष्णुचे स्पेलिंग विष्णू, गणपतिचे गणपती वगैरे. इंग्रजीत अल्लाचे Allah करावे लागते, गोवेचे Goa उमर खय्यामचे Omar आणि पुणंचे Poona. प्रत्येक भाषेत उच्चाराच्या आणि लिहिताना लिपीच्या मर्यादा असतात. त्या इच्छा नसली तरी पाळणे भाग पडते.--J १८:३८, २९ मार्च २०११ (UTC)


अकबर-बिरबल कथा : मोठा माणूस होशील !

Share on facebook Share on twitter Share on google_plusone_share Share on print More Sharing Services

story WD जवळच्या गावात असलेल्या नातेवाइकांकडे आठ-दहा वर्षांचा महेशप्रसाद आपल्या ‍वडिलांसोबत जायला निघाला, म्हणून आई त्याला म्हणाली, बाळा जेवण करून जा. तेव्हा तो आईला म्हणाला, आई, मला बिलकुल भूक नाही आहे, तर जेवणात वेळ फुकट कशाला घालवू? नंतर महेश व त्याचे वडील परगावच्या रस्त्याला लागले. काही अंतर चालून गेल्यानंतर भुकेने महेशच्या पोटात कावळे ओरडायला लागले. इतक्यात रस्त्याच्या एक कडेला ब्रह्मदेवाचे मंदिर दिसले, म्हणून महेशचे वडील त्याला घेऊन मंदिरात गेले.

मंदिराच्या गाभार्‍यातील ब्रह्मदेवाच्या चतुर्मखी म्हणजे चार मुखे असलेल्या मूर्तीला वडील भक्तिभावाने नमस्कार करू लागले, तेव्हा भुकेने कासावीस झालेला महेश रडू लागला. हे बघून वडिलांनी त्याला विचारले, महेश, का रे बाळा असा का बर रडतोस आहे ?

आई आपल्याला जेवण करून जा, असे सांगत असूनही आपण तिचे ऐकले नाही. आणि आता जर वडिलांना सांगितले, तर ते आपल्यास रागवतील, अशी भीती वाटून हजर जबाबी महेश वडिलांना म्हणाला, बाबा, मला एकच नाक आहे व सर्दी झाल्यानंतर ते वाहू लागले की, पुसून-पुसून नाकी नऊ येतात, तर मग या चार मुखे असलेल्या ब्रह्मदेवाला सर्दी झाली आणि याची चारही नाके एकाच वेळी वाहू लागली, तर याचे कशे हाल होत असतील? त्याच्या त्या वेळी होणार्‍या फक्त कल्पनेनेच मला रडायला येत आहे.

Start a discussion about राजा बिरबल

Start a discussion
"राजा बिरबल" पानाकडे परत चला.