चर्चा:मॅकरान आंतरराष्ट्रीय विमानतळ

Latest comment: ८ वर्षांपूर्वी by अभय नातू

इंग्रजीतील शब्दाच्या स्पेलिंगमध्ये जर एखाद्या मुळाक्षराचे द्वित्त आले तर त्याची उच्चार दुहेरी न होता एकेरी होतो. उदा० Running, Butter, Occurrence या शब्दांचे उच्चार रन्‍निन्ग, बट्टर, ऑक्कर्‍रन्स असे न होता ते अनुक्रमे रनिंग, बटर, ऑकरन्स असे होतात. MacCarran या शब्दाचा उच्चार करताना Mac हे स्वतंत्र syllable असल्याने कदाचित मॅकरान असा न होता तो मॅक-करान असा असू शकेल. पण

[१]

या पानावर लॉन्गमन या अमेरिकन उच्चारकोशातले काही शब्द दिले आहेत, त्यांत MacCarran चा उच्चार मकॅरन असा दिला आहे. उच्चारात ’क’ दोनदा आलेला नाही. ... (चर्चा) १४:५८, १ जानेवारी २०१६ (IST)Reply

इंग्रजीतील शब्दाच्या स्पेलिंगमध्ये जर एखाद्या मुळाक्षराचे द्वित्त आले तर त्याची उच्चार दुहेरी न होता एकेरी होतो.
बव्हंश ठिकाणी हे बरोबर आहे.
१. Mc या शब्दाला स्कॉटिश/गेलिक/आयरिश मूळ असून त्यास इंग्लिश व्याकरणाचे नियम लागू पडतीलच असे नाही.
२. McXXX हा दोन वेगवेगळ्या शब्दांचा समास असून यातील Mc (किंवा Mac असल्यास त्याचा) अर्थ चा मुलगा असा होतो. येथे McCurran म्हणजे करान/करॅन/करनचा मुलगा असे नाव आहे (जे कालौघात आडनाव म्हणून रूढ झाले.) येथे दोन वेगळे उच्चारले गेले पाहिजेत.
३. दुहेरी मूळाक्षरे उच्चाराचे निःसंदिग्धीकरण करण्यासाठीही वापरले जातात, उदा- runner = रनर आणि runer = रुनर. care = केर (किंवा काहींच्या मते केअर) आणि carre = कॅर, cutter = कटर आणि cuter = क्युटर, इ. यात उच्चार एकाच मूळाक्षराचा होत असला तरी त्याच्या cardinalityचा प्रभाव आधी किंवा नंतरच्या मूळक्षरांच्या उच्चारावर होतो.
4. येथे McCulloghचा उच्चार मॅककुलॉ असा दिला आहे. येथे McCarranचा उच्चार मॅककॅरन असा दिला आहे.
अभय नातू (चर्चा) ००:०९, २ जानेवारी २०१६ (IST)Reply
"मॅकरान आंतरराष्ट्रीय विमानतळ" पानाकडे परत चला.