चर्चा:मुगाची उसळ
Latest comment: ९ वर्षांपूर्वी by Mahitgar
लेख त्वरित बंधुप्रकल्पात स्थानांतरित करावा. ... ज (चर्चा) १६:५३, ८ जुलै २०१५ (IST)
- होय करावयाचा आहे पण अशा अनेक लेखांचे वर्गीकरण करून एकगठ्ठा लेख इतिहासासहीत निर्यातीचा मनोदय आहे. स्थानांतरणपुर्वी मजकुरात प्रताधिकार उल्लंघने नाहीत हे किमान ढोबळमानाने पहावे लागेल आणि त्यासाठी अधिक कालावधी लागू शकतो.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:३९, ८ जुलै २०१५ (IST)
मुगाच्या उसळीवर आजवर हजारो लोकांनी लिहिले असणार. आणि शिवाय ही घरोघरी बनणारी सामान्य पाककृती आहे. लेख लिहिताना प्रताधिकारभंग झाला आहे की नाही हे शोधण्यात युगे उलटतील. शिवाय विकीवर स्वतःच्या प्रतिभेने (मनचे) काहीही लिहिता येत नाही, त्यामुळे हा लेख स्वतंत्र असला तर तो विकीवर येऊच शकत नाही. ... ज (चर्चा) ०९:४१, ९ जुलै २०१५ (IST).
- वर्ग:खाद्यपदार्थ मधील ६ उपवर्ग आणि ६३ लेख; वर्ग:अन्न ९ उपवर्गातील लेख आणि १९ लेख; वर्ग:अन्न व पेये दोन उपवर्गातील लेख आणि २ लेख; वर्ग:पाककृती मधील १७ लेख; वर्ग:पाककला मधील ७ उपवर्ग आणि १२ लेख साधारणत: दिडशेच्या आसपास भरतील एवढे लेख तपासून ज्यात विकिबुक्समध्ये स्थानांतरीत करण्या जोगा मजकुर आहे त्या सर्वांना वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख ने वर्गीकृत करावयाचे काम बाकी आहे. हे करताना काही खाद्यपदार्थ विषयक लेखांमध्ये ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेलाही मजकुर असेल तो ठेवणे आणि कृती विषयक मजकुर तेवढा हलवणे हे करावयाचे आहे. वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख हा वर्ग लेख अथवा मजकुर स्थानांतरीत करावयाचा आहे त्या लेखांना लावण्यात आपले साहाय्य मिळाल्यास हवे आहे. कारण एकुण स्थालांतराच्या प्रक्रीयेतला तो महत्वाचा टप्पा आहे.
- बाकी ढोबळमानाने असा शब्द प्रयोग केला आहे त्याकडे आपले लक्ष गेले नसावे. बाकी प्रताधिकार विषयावर मी इतरत्र बरेच लिहिले आहे तेव्हा येथे पुनरुक्तीचा मोह टाळतो.
- आपण लिहिलेल्या कुंजवन लेखातील मजकुराची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता साशंकीत असुनही निर्णय करण्यात घाई केलेली नाही. स्वशब्दात, संदर्भासहीत, प्रताधीकारमुक्त ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनास फोकस असावयास हवे, प्रशासकीय कामेही काळाच्या ओघात होत राहतील, विकिबुक्समध्ये स्थानांतरणाचा विषय महत्वाचा आहेच पण तुर्तास खूप तातडीच्या चिंतेचा नाही.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३८, ९ जुलै २०१५ (IST)